Rajeshwari Kharat And Somnath Awghade Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat And Somnath Awghade: कशी काय मग जोडी..., 'फ्रँड्री'तील शालू आणि जब्याचा एकत्र फोटो व्हायरल

Rajeshwari Kharat And Somnath Awghade Photo: ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपातील शालू आणि जब्या या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरातने शालूची भूमिका तर सोमनाथ अवघडेने जब्याची भूमिका साकारली होती.

Priya More

Fandry Movie:

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'फ्रँड्री' चित्रपटाला (Fandry Movie) प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली. ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपातील शालू आणि जब्या या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी खरातने (Rajeshwari Kharat) शालूची भूमिका तर सोमनाथ अवघडेने (Somnath Awaghade) जब्याची भूमिका साकारली होती. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटानंतर शालू आणि जब्याला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. अशामध्ये आता शालू आणि जब्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

राजेश्वरी खरातने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोमनाथ अवघडेसोबतचा फोटो शेअर केला आहे. फ्रँड्रीमध्ये दिसणारे शालू आणि जब्या आता खूपच मोठे झाले आहेत. जब्याला तर ओळखणं देखील कठीण झाले आहे. शालू आणि जब्याला एकत्र पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. जब्यासोबतचा फोटो शेअर करत राजेश्वरीने त्याला सुंदर कॅप्शन दिले आहे. 'कशी काय मग जोडी...' असे कॅप्शन देत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. त्याचसोबत तिने शालू जब्या फॉरेव्हर असा हॅशटॅग देखील वापरला आहे. शालू आणि जब्याच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दिली आहे.

राजेश्वरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी फ्रँड्री चित्रपटातील गाणं 'तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला.', अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या युजरने 'नागराज सरने बनादी जोडी', अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या युजरने 'काळी चिमणी घावली जब्याला.' अशी कमेंट केली आहे. तर चौथ्या युजरने 'काळया चिमणीची राख भेटली वाटतं जब्याला', अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी 'जोडी जबरदस्त', 'परफेक्ट जोडी', अशी कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांचा याआधी देखील एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या कपलनेच मागच्या वर्षी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पोस्ट करत राजेश्वरीने रेड कलरचा हार्ट इमोजी देखील पोस्ट केला होता. यावरून दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या कपलचा नुकताच व्हायरल झालेल्या फोटोवरून दोघे खरंच प्रेमात पडले की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Pune : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार, फ्रेंच कंपनीशी करार; पहिल्यांदाच सर्व महिला लोको पायलट्स असणार

IBPS RRB Recruitment: बँकेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १३००० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT