Rajeshwari Kharat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajeshwari Kharat Married: काळी चिमणी घावली! जब्या आणि शालूचं लग्न उरकले, पहिला फोटो समोर

Rajeshwari Kharat: फॅन्ड्री चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरातनं नुकतंच लग्न केलं आहे.

Manasvi Choudhary

नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसतेय. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षक आवडीने ऐकतात. चित्रपटातील कलाकर, त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. फॅन्ड्री चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरातनं नुकतंच लग्न केलं आहे. राजेश्वरीने फॅन्ड्री चित्रपटातील सोमनाथ अवघडेसोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

फॅन्ड्री चित्रपटातून रात्रीत स्टार झालेली ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जीवनसाथी होणार की काय असं दिसत आहे. सोशल मीडियावर राजेश्वरीने तिचे लग्नसोहळ्यातील फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाचा निळ्या रंगाचा शालू राजेश्वरीने परिधान केला आहे. तर सोमनाथने शेरवानी परिधान केली आहे. या दोघांच्या डोक्याला बाशिंग बांधले आहे.

नुकताच राजेश्वरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक फोटो सर्वत्र चर्चेत आला आहे. हा फोटो लग्नमंडपातील आहे. सोशल मीडियावर राजेश्वरीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहेत तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोघाचं लग्न होणार असल्याचं म्हटलं आहे.तर एकाने हा नवीन प्रोजेक्ट आहे की काय असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर या दोघाच्या नात्याची कायमच चर्चा सुरू असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT