Sonu Sood Fan gave him a Gift Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Fan Moment: सोनू सूदला मिळाले चाहत्याकडून अनोखी भेट, प्रेम पाहून अभिनेता झाला निःशब्द

सोनू सूदच्या एका चाहत्याने त्याला एक अतिशय सुंदर सरप्राईज देऊन आश्चर्यचकित केले.

Pooja Dange

Fan Makes Portrait Of Sonu Sood: बॉलिवूड कलाकार जसे पात्र चित्रपटांमध्ये साकारतात तशीच त्यांची प्रतिमा बाहेरच्या जगात देखील होते. पण अभिनेता सोनू सूडने कोविडच्या काळात लोकांना जी मदत केली त्यामुळे सोनू अनेकांसाठी रियल लाईफ हिरो झाला आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदची फॅन फॉलोइंग इतकी आहे की त्याच्या प्रत्येक कृतीवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात.

सोनू सूद त्याच्या चाहत्यांना त्यांना हव्या त्या गोष्टी देऊन खुश करतो. तसेच चाहतेही त्यांच्या हिरोसाठी काहीतरी खास करत असतात. अलीकडेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त सोनू सूदच्या एका चाहत्याने त्याला एक अतिशय सुंदर सरप्राईज देऊन आश्चर्यचकित केले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, चला तर मग जाणून घेऊया सोनू सूदला काय गिफ्ट मिळाले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त, महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात सोनू सूदच्या एका चाहत्याने अभिनेत्याचे 87,000 चौरस फुटांचे पोर्ट्रेट बनवले आहे. सोनू सूदचे चाहते आणि चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर यांनी उद्यानात हे चित्र साकारण्यासाठी ७ टनांहून अधिक रांगोळी वापर केला आहे. ही रांगोळी बनवायला विपुलला अनेक दिवस लागला. चाहत्यांच्या या कलाकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना सोनू सूदने लिहिले की, 'मला या क्षणी खूप नम्र वाटत आहे... सर्वात मोठ्या रांगोळीचा विश्वविक्रम. 87000 चौ.फू. ७ टन रांगोळी.

चाहत्यांनी बनवलेल्या या रांगोळीबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला, 'माझ्याकडे शब्द नाहीत, लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळे मी धन्य झालो आहे, मी सोलापूरच्या विपुलचे आभार मानतो, ज्याने 87,000 चौ. सर्वात मोठ्या रांगोळीचा विश्वविक्रम केला त्याचा मला अभिमान आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT