Sonu Sood On Canadian Citizenship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Canada Citizenship: सोनू सूद कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारणार? चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्याचं जबरदस्त उत्तर

Chetan Bodke

Sonu Sood On Canadian Citizenship: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊन पासून बराच चर्चेत आला आहे. अभिनय क्षेत्रात करियर घडवणारा सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात लोकांना केलेल्या मदतीमुळे रातोरात चर्चेत आला होता. अभिनयामुळे चर्चेत न राहणारा सोनू सूद नेहमीच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो. सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा देखील प्रयत्न करतो. नुकतंच त्याने ‘आस्क मी सेशन’ घेतलं. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांशी संवाद साधला.

ट्वीटरच्या माध्यमातून सोनूने ‘#AskSonu’ हे सेशन सुरू केलंय. या सेशनमध्ये तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. यावेळी सोनूला त्याच्या एका चाहत्याने भन्नाट प्रश्न विचारला आहे. सेशनमध्ये चाहत्याने प्रश्न विचारला, ‘जर तूझे चित्रपट फ्लॉप ठरले तर, तू भविष्यात कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारणार का?’ असा प्रश्न विचारल्यामुळे सोनू सध्या चर्चेत आला आहे.

या प्रश्नावर सोनूने देखील उत्तर दिले आहे. सोनू म्हणतो, ‘आपलं आयुष्य एका चित्रपटापेक्षा पण फार मोठं आहे. आपल्या भारतापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही…’ सोनूने असं उत्तर दिल्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.

तर आणखी एका युजरने त्याला प्रश्न विचारला आहे. युजर म्हणतो, ‘तुला लोक देव म्हणतात.. तर तुला असं ऐकून कसं वाटतं…’ या प्रश्नावर अभिनेत्याने उत्तर दिले की, ‘मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि मी दुसऱ्या सामान्य व्यक्तीसोबत संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करत असतो…’

नंतर पुढे सोनूला एक युजर म्हणतो, ‘माझे कुटुंबीय मला बुलेट घेऊन देत ​​नाहीत, तुम्ही मला एक बुलेट घेऊन द्या.’ यावर सोनूने मिश्किल भाषेत उत्तर दिलंय. युजरला उत्तर देत सोनू म्हणतो, ‘नंतर तू माझ्याकडे पैशांची ही मागणी करशील...’

आणखी एक युजर सोनू सूदला म्हणतो, ‘सर प्लीज माझी बायको गोलूला सांगा की मी तिच्यावर खूप प्रेम करतो.’, यावर सोनूने विनोदी अंदाजात उत्तर दिले आहे, सोनू सूद म्हणतो, ‘गोलू वहिनी... सोहेल भाऊ तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो. तुझ्यावर प्रेम आहे,त्यांची काळजी घ्या…’ सध्या सोनू सूदच्या या ‘आस्क मी सेशन’ची बरीच चर्चा रंगली आहे.

सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनू लवकरच ‘फतेह’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी कलाकार भरपूर मेहनत घेत आहेत. दरम्यान, सोनूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला होता, त्या व्हिडीओमध्ये तो हिमाचल प्रदेशमधील पर्वतांमध्ये शर्टलेस वर्कआउट करताना दिसत आहे.

‘फतेह’ हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून यामध्ये सोनू एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनू सूदच्या स्वतःचे होम प्रॉडक्शन असलेले शक्ती सागर प्रॉडक्शनमधून त्याची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT