Pop Star Shakira
Pop Star Shakira Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pop Star Shakira : पॉप स्टार शकिराला होणार ८ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पॉप स्टार शकिराला(Shakira) आठ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. टॅक्स फ्रॉडचा तिच्यावर आरोप आहे. शकिराला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.

सौंदर्य आणि संगीत यामुळे संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी पॉपस्टार शकिराचं प्रत्येक गाणं नेहमी सुपरहीट होतं. शकिराचा भारतातही फार मोठा चाहता वर्ग आहे, जो नेहमी(social media) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला फॉलो करत असतो. दरम्यान, शाकिराचे चाहते तिला पुढील तब्बल ८ वर्षे पाहू शकणार नाहीत. कारण शकिराला आठ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. करचुकवेगिरीच्या आरोपांवरील तिची याचिका फेटाळल्यामुळे ८ वर्षांपेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी केली आहे.

स्पॅनिश वकिलांनी सांगितले की, त्यांनी जागतिक संगीत सुपरस्टार शकिराला आठ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. शकिरावरील करचुकवेगिरीच्या आरोपांवरील याचिका फेटाळली आहे. बार्सिलोनामधील वकिलांनी ४५ वर्षीय 'हिप्स डॉन्ट लाय' या गाण्याची प्रसिद्ध गायिका शकिराने २०१२ आणि २०१४ दरम्यान कमावलेल्या उत्पन्नापैकी १४.५ दशलक्ष युरो कर न भरल्याचा आणि स्पॅनिश कर कार्यालयाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

यावर, शकिराच्या वकिलांनी म्हटले आहे की, शकिराने २०१५ मध्ये सर्व कर भरले होते आणि त्यानंतर तिच्याकडे कोणत्याच प्रकारची कर थकबाकी नव्हती. शकिराच्या म्हणण्यानुसार, तिने स्पॅनिश कर अधिकाऱ्यांना १७.२ दशलक्ष युरो कर स्वरुपात रोख दिले आहेत. शकिराचे म्हणणे आहे की, २०१४ पर्यंत तिने तिचे बहुतेक पैसे आंतरराष्ट्रीय टूरमधून कमावले होते, स्पेनमध्ये ती वर्षातून सहा महिन्यांपेक्षाही कमी काळ राहिली होती. त्यामुळे शकिरा ही कर कायद्यानुसार स्पेनची रहिवासी नाही. म्हणून तिने हे सर्व आरोप याचिकेद्वारे फेटाळल्याचे सांगितले.

६० दशलक्षाहून अधिक अल्बम विकण्यात आलेल्या शकिराचे जून महिन्यामध्ये जेरार्ड पिक या स्पॅनिश फुटबॉलपटू सोबत ब्रेकअप झालं आहे. या कपलला दोन मुलं आहेत. सध्या शकिरा सिंगल असून तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदी मुंबईत विविध ठिकाणी भेट देणार

Mumbai Mega Block News : 17 मे पासून मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवेवर होणार परिणाम

Bhubaneswar Pune Special Train: पुणेकरांनाे! भुवनेश्वर-पुणे रेल्वे सोलापूरपर्यंतच धावणार, जाणून घ्या कारण

Mahadev Betting Case Update: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Devendra Fadnavis : 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT