Sanjay Dutt Birthday: बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' संजय दत्तचे हे ५ डायलॉग; झक्कास चीज...

बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' संजय दत्तने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयानं राज्य केलं आहेv
Sanjay Dutt Birthday
Sanjay Dutt BirthdaySaam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' संजय दत्तने(Sanjay Dutt) गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयानं राज्य केलं आहे. त्याचे डायलॉग तर फेमस आहेत. कॉमेडी चित्रपटांतूनही त्यानं भरपूर मनोरंजन केले आहे.

Sanjay Dutt Birthday
Waat Laga Denge Song Out: 'वाट लगा देंगे' गाणं आलं रे; विजय देवरकोंडाचा सॉलिड आवाज

रॉकी(Rockey) या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यामध्ये त्याने लव्हरबॉयची भूमिका साकारली होती. त्याचसोबत संजयने साकारलेल्या वास्तवमधील गँगस्टर असो किंवा मुन्नाभाईचे दोन्ही सिनेमा असो, ज्यात त्याने आपल्या सिस्टीममधील त्रुटींबद्दल विचार करायला भाग पडले होते.

Sanjay Dutt Birthday
Tanushree Dutta : मला काहीही झालं तर नाना पाटेकर... तनुश्री दत्ताच्या सोशल पोस्टने खळबळ

संजय दत्तने त्याच्या करियरमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. संजू बाबा म्हणून ओळखला जाणारा, संजय दत्त आज ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी, आपण जाणून घेऊयात संजय दत्तचे पाच सर्वोत्कृष्ट डायलॉग ज्याचे प्रेक्षक आजही फॅन आहेत.

१) असली है असली ... पचास तोला, पचास तोला ... कितना, 50 टोला – वास्तव

त्याचा आजपर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा यामध्ये एका सध्या घरातील मुलाला कसे गुन्हेगारीच्या जगात खेचले जाते हे दाखवले आहे.

२) वह बाहर कॅजुअल्टी में कोई मरने की हालत में रहा ... तो उस्सको फॉर्म भरना ज़रूरी है – मुन्नाभाई एमबीबीएस

हा एक असा डायलॉग जो आपल्याला सिस्टममधील त्रुटींबद्दल विचार करण्यास भाग पाडतो.

३) जब दोनों गाल पे पड जाये तोह क्या करनेका; यह बापू ने नहीं कहा अपुन को – लगे रहो मुन्नाभाई

जेव्हा तुम्ही गांधीजींच्या तत्त्वांचे पालन करता पण त्यात तुमचा स्वॅग देखील वापरता अस हा डायलॉग आहे.

४) तुम क्या लेके आये थे, और क्या लेके जाओगे. रहेजाये सिर्फ एक इंसान सर्व शक्ति शाली, सर्व शक्तिमान, – अग्निपथ

अग्निपथमधील 'कांचा' हा कुरूप व्यक्ती लोकांना घाबरवण्यासाठी आणि स्वतःला सर्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी नेहमी क्रूर कृत्य करत असतो.

५) तक़दीर तेरी छुट्टी पे है, मौत तेरे सर्र पे है; लेकिन बातें ऐसे करता है, जैसे ज़िन्दगी तेरे बिस्तर पे है" – मुसाफिर

जेव्हा डॉनची भूमिका करताना अभिनेता स्वतःलाच बॉस समजायला लागतो तेव्हा तो असं बोलतो.

संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले तर, संजय दत्तचा 'शमशेरा' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामध्ये संजय दत्तने शुद्ध सिंगची भूमिका सकारली. या सिनेमामध्ये संजय दत्तसोबत रणबीर कपूर आणि वाणी कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com