Famous Singer Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer Death : संगीत विश्वावर शोककळा; दिग्गज गायकाचे निधन, मूत्रपिंडाच्या आजाराशी सुरू होती झुंज

Famous Singer Passes Away : संगीतविश्वाला मोठा धक्का बसला. प्रसिद्ध गायकाचे निधन झाले. गायक मूत्रपिंडाच्या विकाराशी दीर्घकाळ लढा देत होता.

Shreya Maskar

संगीत विश्वावर शोककळा

प्रसिद्ध गायकाचे निधन झाले.

गायक मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होता.

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. संगीत विश्वातील तेजस्वी तारा हरपला. 'डॉ. हुक' (Dr. Hook) या बँडचा सुप्रसिद्ध आवाज असलेले डेनिस लोकोरियर (Dennis Locorriere) यांचे शनिवार (१६ मे २०२६) रोजी निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी गायकाने अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंडाच्या विकाराशी (किडनीचा आजार) दीर्घकाळ लढा दिल्यानंतर गायकाची प्राणज्योत मालवली.

TMZ च्या वृत्तानुसार, गायकाच्या व्यवस्थापन टीमने जारी केलेल्या एका निवेदनात या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या निवेदनानुसार, "मूत्रपिंडाच्या विकाराशी केलेल्या दीर्घ आणि धैर्यापूर्ण संघर्षानंतर १६ मे २०२६ रोजी आपल्या प्रियजनांच्या सानिध्यात डेनिस यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला.डेनिस यांनी अतुलनीय सामर्थ्य, प्रतिष्ठा आणि चिकाटीने आपल्या आजाराचा सामना केला आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते..."

गायक डेनिस लोकोरियर यांचा जन्म १३ जून १९४९ रोजी न्यू जर्सी येथे झाला. त्यांनी २४ वर्षे युनायटेड किंगडममध्ये वास्तव्य केले. १९७५ पर्यंत ते 'डॉ. हुक अँड द मेडिसिन शो' (Dr. Hook & the Medicine Show) या बँडचा एक भाग होते. संगीतासाठी सहा दशकांहून अधिक काळ समर्पित करणाऱ्या डेनिस लोकोरियर यांनी आपल्या कारकिर्दीत तसेच बँडचा भाग म्हणून एकूण १८ अल्बम प्रकाशित केले.

गायकाच्या आवाजाचे चाहते दिवाने होते. त्यांनी आपल्या गोड आवाजाने जगाला मंत्रमुग्ध केले. गायकाच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांचा इंडिया आघाडीला भेटीस नकार, पाहा काय दिलं कारण

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री! सलमान खाननं वीकेंड का वारमध्ये दिलं सरप्राइज, सोशल मीडिया स्टार आहे तरी कोण?

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT