Famous Singer Baljit Singh passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Death: प्रसिद्ध गायकाचा वयाच्या ३५व्या वर्षी मृत्यू ; घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Famous Singer Death: पंजाबी गायक बलजीत सिंह यांचा लुधियानातील घरात मृतदेह आढळला. चार-पाच दिवसांपासून ते कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हते. घरात रक्ताचे डाग सापडले आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.

Shruti Vilas Kadam

Famous Singer Death: संगीत क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे गायक आणि गीतकार बलजीत सिंह यांचा मृतदेह लुधियानातील सुधार येथील त्यांच्या घरातून आढळून आला. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते घरात एकटे राहत होते. मागील चार ते पाच दिवसांपासून कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बलजीत सिंह यांचा मृतदेह बेडवर आढळला. अनेक दिवस उलटल्यामुळे मृतदेहाची अवस्था खराब झाली होती. घरातील काही ठिकाणी आणि मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळून आले. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला होता. पोलिसांनी हत्या किंवा अन्य कोणतीही शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि सीआयएची टीमही दाखल झाली. पोलिसांनी घरातून आवश्यक पुरावे गोळा केले असून, आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. बलजीत सिंह यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या संपर्कात कोण होते, याचीही माहिती घेतली जात आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बलजीत सिंह यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचे पोस्टमार्टममध्ये समोर आले आहे. सध्या पोलिसांनी प्राथमिक तपासात घातपाताची शक्यता नाकारली आहे. मात्र घरात आढळलेल्या रक्ताच्या डागांसह इतर परिस्थितींचाही तपास केला जात आहे.

बलजीत सिंह सुधारच्या पत्ती धालीवाल परिसरात राहत होते. मागील काही काळात ते अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. तसेच त्यांच्या काही गाण्यांमध्ये पंजाबमधील गँगस्टर्सचे उदात्तीकरण केल्याचे आरोपही झाले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचा या बाबींशी संबंध असल्याचे सध्या कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. पंजाबी आणि प्रादेशिक संगीत क्षेत्रासाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. नुकतेच हरियाणवी गायक अंकित बलियान यांच्या हत्येने संगीतविश्व हादरले होते. त्यानंतर आता बलजीत सिंह यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने पुन्हा एकदा पंजाबी कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today’s Horoscope: 12 राशींचं भविष्य जाणून घ्या; कोणाला मिळणार नवी संधी, कोणासाठी दिवस असेल खास?

लाऊडस्पीकर लावायचाय, एक लाख भरा! गणपती मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाला आळा

Maharashtra News Live Update: IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण,कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

गणपती विसर्जनावर दुष्काळाचं सावट, मराठवाड्यात नदी, धरण, विहिरी कोरड्या, पाण्याविना गणपतीचं विसर्जन रखडणार?

वेलकम’, ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचं निधन;१५ दिवसांची झुंज अखेर संपली, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT