Famous Singer alex bueno passes away  saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer Death: प्रसिद्ध गायकाचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; संगीत विश्वात शोककळा

Singer Death: संगीतविश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायकाचे निधन झाले. कॅन्सरशी दीर्घकाळ सुरू असलेल्या लढाईनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Shruti Vilas Kadam

Singer Death: डोमिनिकन संगीतविश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय गायक अ‍ॅलेक्स बुएनो यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. कॅन्सरशी दीर्घकाळ सुरू असलेल्या लढाईनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

अ‍ॅलेक्स बुएनो हे डोमिनिकन रिपब्लिकमधील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक होते. विशेषतः मेरेंग्यू आणि बाचाटा या संगीतप्रकारांमधील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आवाजातील वेगळेपणा आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅलेक्स बुएनो गेल्या काही काळापासून कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती सातत्याने खालावत गेली. अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. चाहत्यांनी त्यांच्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अ‍ॅलेक्स बुएनो यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. त्यांच्या गीतांनी केवळ डोमिनिकन रिपब्लिकमध्येच नव्हे, तर लॅटिन अमेरिकेसह जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घातली होती. त्यांच्या गाण्यांमधील भावनिकता आणि सुरेलपणा ही त्यांची खास ओळख बनली होती.

संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी त्यांना लॅटिन संगीताचा अमूल्य ठेवा संबोधले आहे. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाने एक अनुभवी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT