Famous Punjabi singer Jaani has also received death threats  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Punjabi Singer Death Threat : सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आता 'या' गायकालाही जिवे मारण्याच्या आल्या धमक्या

आणखी एक पंजाबी गायकाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही लोक या पंजाबी गायकाला फोन करून धमकावत आहेत, त्यामुळे या गायकाच्या घरी दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पंजाबी गायक(Sidhu Moose Wala) सिद्धू मूसवालायाच्या हत्येने संपूर्ण देश धक्का बसला होता. हल्लीच दबंग खान म्हणजेच सलमान खानलाही(Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यानंतर सलमान खानने पोलिसांकडे मदत मागितली होती. त्याचबरोबर त्याला ताबडतोब बंदुकीचा परवाना देखील मिळाला, तसेच बुलेटप्रूफ करही सलमानने खरेदी केली आहे. दरम्यान, आता आणखी एक पंजाबी गायकाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही लोक या पंजाबी गायकाला फोन करून धमकावत आहेत, त्यामुळे या गायकाच्या घरी दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

माहितीनुसार, प्रसिद्ध पंजाबी सिंगर (jaani) जानीलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची बातमी अलीकडेच समोर येत आहे. जानी याने त्याच्या कडेकोट सुरक्षेची मागणी केली आहे. यासाठी त्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, एडीजीपी आणि मोहालीचे एसएसपी यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. त्याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे जानी याने स्वतः सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

माहितीनुसार, जानीला जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे, तो त्याच्या सुरक्षेबद्दल खूप चिंतेत आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्याने सिद्धू मुसेवाला याचा उल्लेख करत स्वत:च्या सुरक्षेची मागणी केली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची गँगस्टर लॉरेन्स विश्नोईच्या टोळीतील सदस्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. जानी हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याची 'तितलीयां', 'मन भरेया', 'बारिश की जाये', 'दूजी वार प्यार', 'फिल्हाल', 'पाचताओगे' इत्यादी गाणी खूप प्रसिद्ध आहेत.

गेल्या महिन्यात जानी याचा धोकादायक अपघात झाला होता. मोहालीमध्ये एसयूव्ही कारमधून प्रवास करणाऱ्या जानी आणि त्याच्या मित्रांचा अचानक रस्ता अपघात झाला. या अपघातात जानी जोहान यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. अपघाताच्या कारणाबाबत बोलताना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, अपघात झालेली दोन्ही वाहने चौकात न थांबल्यामुळे एकमेकांवर आदळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

Maharashtra Live News Update: घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना १० टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा

Jio Special Offer: दिवाळीपूर्वी जिओची खास ऑफर! मोफत डेटा आणि कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे, किंमत किती?

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT