Swaragandharva Sudhir Phadke Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swaragandharva Sudhir Phadke Teaser: 'आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी...'; 'स्वरगंधर्व सुधीर फडके'चा टीझर रिलीज

Swaragandharva Sudhir Phadke Biopic: मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी ग.दि.माडगुळकर रचित गीतरामायणाला स्वरसाज देणारे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या 'स्वरगंधर्व सुधीर फडके' ह्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

Chetan Bodke

Swaragandharva Sudhir Phadke Teaser

मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी ग.दि.माडगुळकर रचित गीतरामायणाला स्वरसाज देणारे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' नावाचा बायोपिक लवकरच रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. चित्रपटाची गेल्या वर्षीच घोषणा करण्यात आली होती. अशातच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा टीझर आला आहे. या टीझरमध्ये 'स्वरगंधर्व सुधीर फडके' यांच्या जीवनातील अनेक महत्वाचे टप्पे पाहायला मिळत आहेत. (Marathi Film)

ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या 'गीतरामायणा'ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा बायोपिक येत्या १ मे २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपट येत्या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होणार असून संगीत प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या बायोपिकच्या माध्यमातून सुधीर फडके यांचे जीवन चित्रपटातून उलगडणार आहे. (Biopic)

टीझरमध्ये 'माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते.' असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच 'बाबुजीं'च्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. यामध्ये त्यांची मेहनत आणि जिद्द पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये देव देवाऱ्यात नाही, या गाण्याचीही झलक प्रेक्षकांना ऐकायला मिळते. हा दुसरा टीझर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गीतरामायणाच्या माध्यमातून बाबूजींच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. (Social Media)

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

SCROLL FOR NEXT