Jasmin Bhasin Lens Mishap Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jasmin Bhasin News : आधी त्रास झाला, मग दिसणंही बंद झालं; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला लेन्स वापरणं पडलं महागात

Jasmin Bhasin Lens Mishap : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनच्या डोळ्याला लेन्स लावल्यामुळे गंभीर इजा झाली आहे. डोळ्यांना दुखापत झाली असून तिला लेन्स लावल्यामुळे दिसणंही बंद झालेलं आहे.

Chetan Bodke

प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनसंबंधित महत्वाची बातमी समोर येत आहे. डोळ्याला लेन्स लावल्यामुळे जास्मिनच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या डोळ्यांना दुखापत झाली असून तिला लेन्स लावल्यामुळे दिसणंही बंद झालेलं आहे.

जास्मिनने दिलेल्या माहितीनुसार, "१७ जुलैला मी दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेली होती. मी कार्यक्रमाला जाण्यासाठी डोळ्याला लेन्स लावल्या होत्या. लेन्स लावल्यानंतर अचानक माझ्या डोळ्यांना जळजळ होऊ लागली. मी लगेचच डॉक्टरांकडे जायला हवं होतं. पण माझ्या काही कामामुळे मला डॉक्टरांकडे जायला जमलं नाही. मी आधी कार्यक्रमाला जायचं ठरवलं आणि नंतर पुढे डॉक्टरांकडे जायचं ठरवलं होतं. मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेसच घालून होते."

"काही काळानंतर मला अचानक दिसू न लागल्यामुळे माझ्या टीमने मला संपूर्ण कार्यक्रमात खूप मदत केली. त्या कार्यक्रमावरून घरी परतल्यानंतर मी लगेचच नेत्ररोग तज्ज्ञांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितले की, डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे. यानंतर डोळ्यांवर पट्टी लावण्यात आली." सध्या अभिनेत्री मुंबईत परतली असून तिच्यावर मुंबईत पुढील उपचार केले जाणार आहेत. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या डोळ्याला अजूनही खूप वेदना होत आहेत.

"सध्या व्यवस्थित उपचार सुरू असून डोळ्यांना खूप वेदना होत आहेत. येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये मी बरी होईल असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. येत्या पुढचे काही दिवस मला डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. डोळे दुखत असल्यामुळे मला काहीही दिसत नसून मला रात्री झोपतानाही खूप त्रास होत आहे. " असं अभिनेत्रीने सांगितले आहे.

जास्मिन भसीनच्या कामाबद्दल बोलायचे तर, अलीकडेच जास्मिन आणि तिचा बॉयफ्रेंड अली गोनी हे दोघंही ‘लाफ्टर शेफ’ शोमध्ये एकत्र आले होते. यामध्ये त्या दोघांनीही एकत्र स्वयंपाकही बनवला. त्याशिवाय अभिनेत्री रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी १४’ या शोमध्येही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT