famous French actor Christian Bujeau passes away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; परिवाराने लपवली निधनाची बातमी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Actor Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचे १५ जून रोजी निधन झाले आहे. त्यांच्या परिवाराने त्यांच्या निधनाची बातमी न सांगता त्यांच्या एजन्सीने या बातमीचा खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Death: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. फ्रेंच चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते ख्रिश्चन बुजो (Christian Bujeau) यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. सोमवार 15 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे फ्रेंच चित्रपटसृष्टीसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

14 ऑक्टोबर 1944 रोजी जन्मलेल्या ख्रिश्चन बुजो यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी एक व्यावसायिक स्टंटमॅन म्हणून काम केले होते. तलवारबाजी आणि घोडदौडीचे विशेष प्रशिक्षण घेतलेल्या बुजो यांनी अनेक वर्षे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या अनुभवामुळे त्यांना ऐतिहासिक आणि ॲक्शन फिल्ममधील भूमिकांमध्ये विशेष प्रावीण्य मिळाले.

अभिनय क्षेत्रात त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ख्रिश्चन बुजो यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती ‘कामेलॉट’ (Kaamelott) या गाजलेल्या मालिकेमुळे. या मालिकेत त्यांनी ‘मास्टर-एट-आर्म्स’ ही भूमिका साकारली होती. राजा आर्थरच्या सैन्याला प्रशिक्षण देणारा कठोर, स्पष्टवक्ता आणि शिस्तप्रिय प्रशिक्षक म्हणून त्यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. विशेष म्हणजे ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करूनच तयार करण्यात आली होती. ते सिरीजच्या पाचही सीझनमध्ये झळकले.

याशिवाय 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द व्हिजिटर्स’ (The Visitors) या सुपरहिट चित्रपटाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. आपल्या अखेरच्या दिवसांपर्यंत ख्रिश्चन बुजो अभिनय क्षेत्रात काम करत होते. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सुर ला दाल’ (Sur la dalle) हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबाने नाही तर त्यांच्या एजन्सीने सांगितली. त्यांचे निधन कोणत्या कारणामुळे झाले ते अजून सांगण्यात आले नाही.

त्यांच्या निधनामुळे फ्रेंच चित्रपटसृष्टीतील एका अनुभवी कलाकाराचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या अभिनय प्रवासाने अनेक कलाकारांना प्रेरणा दिली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून चाहते आणि सहकारी कलाकार त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghantali Hi Tutena video : "मी खाणं-पिणं सोडून देईन..."; समर स्वानंदीच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकटं, नव्या ट्विस्टनं राजवाडेंच्या घरात वादळ

मधुमेह कंट्रोलमध्ये आणेल 'हे' एक ड्रिंक, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; फुटीर ६ खासदार शिवसेनेत विलीन

Political News : अरविंद सावंत संतापले, राजाभाऊ वाजे भावुक; पत्रकार परिषदेत कोण काय म्हणाले? पाहा सविस्तर

पुण्यात 'ते' चार्टर विमान उतरलं अन्...; खासदार ओमराजेंच्या 'त्या' गुप्त प्रवासावर ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT