Ameen Sayani Passed Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ameen Sayani : रेडिओवरील 'गीतमाला'तील 'सूरमणी' हरपला! आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचं मुंबईत निधन

Ameen Sayani Dies At Age Of 91: रेडिओच्या जगतातील आवाजाचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज रेडिओ प्रेजेंटर आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी (Ameen Sayani ) यांचे निधन झाले आहे.

Priya More

Ameen Sayani Passed Away:

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता ऋतुराजचे २० फेब्रुवारीला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खातून सावरत नाही तोवरच मनोरंजनसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. मनोरंजनसृष्टीतून आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. रेडिओच्या जगतातील आवाजाचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज रेडिओ प्रेजेंटर आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी (Ameen Sayani ) यांचे निधन झाले आहे. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अमीन सयानी यांचे मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी यांनी त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांना सांगितली. अमीन सयानी यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत सेलिब्रिटींसह त्यांचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, अमीन सयानी यांना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दक्षिण मुंबईतील घरी हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयोमानानुसार इतर आजार झाले होते. त्यांना मागील 12 वर्षांपासून पाठदुखीचा त्रास देखील होत होता. त्यामुळे त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता.

रेडिओवर तब्बल 42 वर्षे चाललेल्या 'बिनाका गीतमाला' या त्यांच्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. अमीन सयानी यांना ऐकण्यासाठी त्यांचे चाहते दर आठवड्याला वाट पाहायचे. 'गीतमाला'मुळे अमीन सयानी हे भारतातील सर्वात पहिले होस्ट बनले होते. त्यांनी हा संपूर्ण शो सादर केला होता. अमीन सयांनी यांनी या शोच्या माध्यमातून रेडिओ जगतामध्ये आपले वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता.

दरम्यान, अमीन सयानी यांच्या नावावर रेडिओवरील ५४ हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम होते. हे कार्यक्रम प्रोड्युस करणे, त्यांना व्हॉईसओव्हर देण्याचे काम देखील त्यांनीच केले होते. जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज देण्यासाठी अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT