Flutist Deepak Sarma Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Flutist Death: प्रसिद्ध बासरीवादकाचे निधन; संगीत विश्वावर शोककळा

Flutist Deepak Sarma Passes Away: प्रसिद्ध बासरीवादक दीपक शर्मा यांचे सोमवारी वयाच्या ५७ व्या वर्षी चेन्नईच्या रुग्णालयात निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Flutist Deepak Sarma Passes Away: प्रसिद्ध बासरीवादक दीपक सरमा यांचे सोमवारी वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच काळापासून यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

दीपक सरमा यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले जात आहे

आसामचे प्रसिद्ध बासरीवादक दीपक सरमा गेल्या काही वर्षांपासून दीर्घकालीन यकृताच्या आजाराशी झुंजत होते आणि गेल्या महिन्यात ते उपचारासाठी चेन्नईला गेले होते. तेथेच त्यांचे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने आसामच्या सांस्कृतिक समुदायाला खूप दुःख झाले आहे. दीपक सरमा हे प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य होते.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दुःख व्यक्त केले

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दीपक सरमा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत लिहीले की, "प्रसिद्ध बासरीवादक दीपक सरमा यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून अत्यंत दुःख झाले. त्यांनी आसामी संगीतात अमूल्य योगदान दिले आणि बासरीला एक वाद्य म्हणून लोकप्रिय केले. शोकग्रस्त कुटुंब आणि हितचिंतकांना माझ्या संवेदना. ओम शांती.

दीपक सरमा यांची कारकीर्द

दीपक सरमा हे दिग्गज बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य होते. त्यांनी भूपेन हजारिका आणि झुबीन गर्ग यांच्यासह आसाममधील काही महान सांस्कृतिक दिग्गजांसोबत काम केले होते. सरमा यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही काम केले आहे. ते अनेक हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचा भाग देखील राहिला आहे. दीपक शर्मा हे आसामच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT