Raju Srivastava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava Health Update : राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत समोर आली नवी अपडेट; डॉक्टर म्हणाले...

राजूचे चाहते त्याच्या तब्येतीचे अपडेट जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. नुकताच राजू श्रीवास्तवचा एमआरआय रिपोर्ट आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Srivastava Health Update |मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तवची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तवर(Raju Srivastava) दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राजूचे निकटवर्तीय आणि हितचिंतक त्याची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत. राजूचे चाहते त्याच्या तब्येतीचे अपडेट जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. नुकताच राजू श्रीवास्तवचा एमआरआय रिपोर्ट(MRI Report) आला आहे. या रिपोर्टमध्ये राजूच्या मेंदूच्या नसा दाबल्यामुळे त्याच्या मेंदूला ऑक्सिजन पोहोचत नसल्याचे नमूद केले आहे.

बुधवारी म्हणजेच १० ऑग्स्ट रोजी व्यायाम करताना राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आला. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जेथे आता राजू लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणजेच व्हेंटिलेटरवर आहे. मधल्या काळात राजूने बोट हलवल्याची बातमी आली होती. वृत्तानुसार, राजूच्या प्रकृतीत विशेष सुधारणा नसल्याचे सांगितले जात आहे.

एका वृत्तानुसार, राजू श्रीवास्तवचा भाऊ दीपूने सांगितले की, एमआरआय रिपोर्टमध्ये तणावामुळे राजूच्या मेंदूतील काही मज्जातंतू दाबल्या गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजूच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितले की, राजूला बरे होण्यासाठी अजून १० दिवस लागू शकतात.

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा उडत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया हँडलवर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांनी लोकांना विनंती केली आहे की त्यांनी कोणत्याही चुकीच्या अफवा पसरवू नये, त्याचबरोबर राजूला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करण्याची विनंती केली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT