Comedian Charlie Chaplin Daughter Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Josephine Chaplin Dies: चार्ली चॅप्लिनची लेक काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Comedian Charlie Chaplin Daughter Dies: चार्ली चॅप्लिनची मुलगी आणि हॉलिवूड अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिनचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Josephine Chaplin Passed Away At The Age Of 74: कॉमेडीस्टार चार्ली चॅप्लिन आज या जगात नसला तरी, त्याच्या चाहत्यांची माहिती फार मोठी आहे. चार्ली चॅप्लिनचं नाव ऐकलं तरी, आपल्या चेहेऱ्यावर आपसूकच हसू येतं. कारण चार्ली नेहमीच प्रेक्षकांना आयुष्यातील कुठल्याही संकटात, दुःखातही हसवायला शिकवतो.

चार्ली चॅप्लिनच्या कुटुंबातुन एक मोठी बातमी समोर येतेय. चार्ली चॅप्लिनची मुलगी आणि हॉलिवूड अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिनचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा १३ जुलै रोजी पॅरिसमध्ये जोसेफिन चॅप्लिनचे निधन झालेय.

जॉसेफिनने वडील चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल टाकत तिने देखील तिच्या सिनेकारकिर्दिची सुरूवात केली. तिने वडील चार्ली चॅप्लिनसोबत ‘लाईमलाईट’ या चित्रपटातून आपल्या सिनेकारकिर्दिची सुरूवात केली असून त्या चित्रपटाच्या कथेचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः चार्ली चॅप्लिनने केले होते. याशिवाय चार्लीच्या लेकीने १९६७ मध्ये ‘अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग’ या चार्लीच्या चित्रपटातही तिने काम केलेय. याशिवाय ‘द मॅन विदाऊट अ फेस’ आणि ‘शॅडोमन’ या चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका केली.

कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे १९४९ मध्ये जोसेफिन चार्ली चॅप्लिनचा जन्म झाला होता. १९५२ मध्ये चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल टाकत तिने सिनेकारकिर्दिची सुरूवात केली. जोसेफिनच्या निधनाची माहिती तिचे भाऊ मायकेल आणि जेराल्डिनसह सर्वच भावांनी अभिनेत्रीच्या निधनाची बातमी दिली.

अभिनेत्रीने १९६९ मध्ये ग्रीकमधील एका व्यावसायिकासोबत लग्नगाठ बांधली होती. तिच्या पतीचे नाव निक्की सिस्टोवारीस होते. पण काही वर्षांनंतर अभिनेत्रीने १९७७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर जोसेफिनने १९८९ मध्ये तिने दुसरा पती आणि पुरातत्वशास्त्रज्ञ जीन-क्लॉड गार्डिनसोबत लग्नगाठ बांधली.

२०१३ मध्ये तिचे दुसरे पती गार्डिनचं निधन झालं. चार्ली चॅप्लिनच्या अभिनयाचा आणि कॉमेडीचा वारसा जोसेफिनने पुढे नेला. जोसेफिनच्या निधनानंतर जगभरातल्या तिच्या फॅन्सनी श्रद्धांजली वाहिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT