Rahul Dholakia On Pakistani Celebrity And Music Composer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rahul Dholakia Post: ‘पाकिस्तानी क्रिकेटर्सनंतर कलाकारंनाही भारतात येण्यासाठी आमंत्रण देऊया?’ ‘रईस’ दिग्दर्शक राहुल ढोलकियाने व्यक्त केली इच्छा

Rahul Dholakia News: बॉलिवूड दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्सप्रमाणे पाकिस्तानी कलाकार सुद्धा भारतात यावेत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.

Chetan Bodke

Rahul Dholakia On Pakistani Celebrity And Music Composer

नुकतंच पाकिस्तानी क्रिकेट संघ २०२३चा वर्ल्डकप सामना खेळण्यासाठी भारतात आले आहेत. तब्बल ७ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर पाकिस्तानी खेळाडू भारतात क्रिकेट खेळण्यासाठी आले आहे. यावरुन सध्या सोशल मीडियावर अनेक मतंमतांतरे आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकतंच यावर ‘रईस’च्या दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे.

राहुल ढोलकिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात ट्वीटर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्सप्रमाण पाकिस्तानी कलाकार सुद्धा भारतात यावेत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.

राहुल ढोलकिया आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “आता भारतात पाकिस्तानी क्रिकेटपटू अधिकृतपणे आले आहेत, आम्ही आमच्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना अभिनय करण्यासाठी आमंत्रित करू शकतो का? आणि सोबतच संगीतकारांना आमंत्रित करु शकतो का?” सध्या राहुल ढोलकिया यांनी केलेल्या पोस्टवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे.

वनडे वर्ल्ड कप २०२३ साठी पाकिस्तानी क्रिकेट संघ भारतात आला आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना नेदरलँडसोबत ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँडचा हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे.

पाकिस्तान संघाला भारतात येण्याचा व्हिसा मिळाला नव्हता. त्यानंतर पाकिस्तानी संघाने याची तक्रार आयसीसीला केली होती. त्यानंतर २८ सप्टेंबरला गुरुवारी पाकिस्तानी संघाचं हैदराबादमध्ये दणक्यात स्वागत झालं. यावेळी क्रिकेट चाहते बाबर आझमसह संपूर्ण टीमला पाहण्यासाठी आतुरलेले होते.

२०१६ मध्ये झालेल्या ‘उरी’ हल्ल्यात एकूण १९ भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय सिनेसृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन उद्योगात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक वर्ष भारतीय चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकार दिसले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

SCROLL FOR NEXT