Choreographer Hospitalised Saam tv
मनोरंजन बातम्या

Choreographer Hospitalised: अचानक छातीत त्रास झाला; प्रसिद्ध कोरिओग्राफरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल

Choreographer Hospitalised: छातीत त्रास झाल्याने प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक अहवाल सामान्य असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Shruti Vilas Kadam

Choreographer Hospitalised: प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर बॉस्को लेस्ली मार्टिस यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. छातीत त्रास आणि अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून बॉस्को कामात अत्यंत व्यस्त होते. याच दरम्यान त्यांना छातीत त्रास होऊ लागला त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी पुढील तपासण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बॉस्को यांच्या टेस्ट आणि सिटीस स्कॅन करण्यात आले. सुरुवातीचे रिपोर्ट समाधानकारक असले तरी कोणताही धोका टाळण्यासाठी डॉक्टर त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहेत. यासह डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

बॉस्को मार्टिस हे 'बॉस्को-सीझर' या लोकप्रिय कोरिओग्राफर जोडीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी कहो ना... प्यार है, झूमे जो पठाण, घुंगरू, तौबा तौबा, सेनोरिटा, गल्लां गुडियां यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांना कोरिओग्राफी केली आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची बातमी समोर आल्यानंतर चाहते अधिकच चिंतेत पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT