Director Death Raj Sen Saam Tv
मनोरंजन बातम्या

Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी झाले होते सन्मानित, मनोरंजन विश्वावर शोककळा

Director Death: प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक राजा सेन यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले. तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सेन यांनी चित्रपट, दूरदर्शन आणि माहितीपट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.

Shruti Vilas Kadam

Director Death: बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राजा सेन यांचे रविवारी वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले. ‘दमु’, ‘आत्मीय स्वजन’ आणि ‘लॅबोरेटरी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ते ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राजा सेन यांची प्रकृती काही काळापासून खालावली होती. कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. वयोमानानुसार होणारे आजार आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांशी ते दीर्घकाळापासून झुंज देत होते.

पडल्याने झाली होती गंभीर दुखापत

राजा सेन यांच्या आरोग्याच्या समस्या काही वर्षांपूर्वी सुरू झाल्या. ‘माया मृदंग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर पडल्याने त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत फार गंभीर वाटली नव्हती. मात्र, कालांतराने त्यांच्या हालचालींवर त्याचा परिणाम होऊ लागला.

यावर्षीच्या सुरुवातीला त्यांच्या शरीराच्या खालच्या भागात अशक्तपणा जाणवू लागला. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यूरोलॉजिकल समस्या असल्याचे निदान झाले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही काळ प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी पापिया सेन आणि कन्या शुभाश्री सेन व श्रेयोशी सेन असा परिवार आहे.

दूरदर्शनपासून केली होती कारकिर्दीची सुरुवात

राजा सेन यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५५ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी बंगाली दूरदर्शनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘आदर्श हिंदू हॉटेल’, ‘आरोग्य निकेतन’ आणि ‘ताराशंकरर छोटो गल्पो’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी चित्रपट आणि माहितीपटांच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला.

तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा मान

राजा सेन यांना १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दमु’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर ‘आत्मीय स्वजन’ या चित्रपटाला कौटुंबिक कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध रवींद्र संगीत गायिका सुचित्रा मित्रा यांच्यावरील माहितीपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला/सांस्कृतिक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

Ideal age gap in marriage: सुखी संसारासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं?

कल्याण कोर्टात पगारवाढीसाठी आंदोलन, २० महिन्यांनंतरही दखल नाही, ५ तारखेला सामूहिक रजेवर जाणार

सलग तीन दिवस सुट्टी जाहीर! शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालय राहणार बंद; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

जबरदस्त! रेल्वे घडवणार 'वनदर्शन', जंगल सफारी, IRCTC चं पर्यटन पॅकेज कसं मिळेल, कधीपासून होणार सुरू? वाचा

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात सुरू, तरी टँकरने BRT डिव्हायडर धुतले! नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT