Famous actress Khushi Mukherjee Gets Slapped  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Sandel: भररस्त्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मारली कानाखाली, व्हिडिओ व्हायरल

Actress Sandel: अभिनेत्री खुशी मुखर्जीने दुबईमध्ये अनोळखी व्यक्तीने कानाखाली मारल्याचा खुलासा करत व्हिडिओ शेअर केला. रडत सांगितलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि वाद सुरू झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Sandel: टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी हिच्यासोबत दुबईमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, दुबईच्या रस्त्यावर एका अनोळखी व्यक्तीने तिला अचानक कानाखाली मारली आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर ती भावुक झाली आणि रडत-रडत संपूर्ण आपबीती सांगितली.

खुशी मुखर्जीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती रडताना दिसते आणि सांगते की ती रात्री रस्त्यावरून चालत असताना एका बाइकवर आलेल्या व्यक्तीने तिला जोरात कानाखाली मारली. त्या घटनेनंतर ती खूप घाबरली असून तिला काय करावे हे समजत नाही.

व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने असा दावा केला की काही लोक जुन्या वैमनस्यातून तिचा छळ करत आहेत. तिने असेही म्हटले की, “मला असे वाटते की संपूर्ण जग माझ्याविरुद्ध आहे.” तिने पोलिसांकडून मदत न मिळाल्याचीही तक्रार केली आणि काही ठिकाणी लोकांवर ‘शरिया कायदा पाळण्यासाठी दबाव टाकला जात आहे’ असा आरोप केला.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री रस्त्यावर चालताना सतत मागे वळून पाहताना दिसते. तिच्या म्हणण्यानुसार, काही लोक तिचा पाठलाग करत असल्याची भीती तिला वाटत होती. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाल्याचेही तिने सांगितले.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, तू ठिक आहेस का? तर आणखी एक म्हणाला स्वत:ची काळजी घे. तर दुसऱ्याने कमेंट केली, पण दुबईमध्ये देखील मुंबईतल्या रिक्षा असतात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेसच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या संभाजीनगर शहरात निदर्शने

Iran War : भारताच्या जहाजांवर होमुर्ज सामुद्रधुनीत हल्ला, इराणच्या सर्वोच्च नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'युद्ध....'

Constipation Relief: 30 मिनिटांत पोट होईल साफ, फॉलो करा हे रुटीन

महत्त्वाची बातमी! टोल प्लाझावर आजपासून नवे नियम लागू; रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य

Tips To Get Glowing Skin: महागड्या फेशियलला करा Bye! हळदीचा खास फेसपॅक देईल नैसर्गिक गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT