Famous Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : मृत्यूपूर्वी बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारने 388 कोटींचा चित्रपट दिला, एकेकाळी अभियन सोडून गेले होते ओशोंकडे

Bollywood Actor Gave Blockbuster Movie Before Death : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने ८० चे दशक गाजवले आहे. अभिनेत्याच्या निधनानंतरही आजही त्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. अभिनेत्याने मृत्यूपर्यंत मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले.

Shreya Maskar

८० च्या दशकात खूप सुपरस्टार होऊन गेले.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने मृत्यूपूर्वी ब्लॉकबस्टर चित्रपट दिला.

आपल्या अभिनयाने अभिनेत्याने प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हटके चित्रपट देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही त्यांचा अभिनय आणि चित्रपट आठवून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येते. अशाच एका ८० च्या दशकातल्या ताऱ्याविषयी आज जाणून घेऊयात. हे सुपरस्टार अभिनेते दुसरे-तिसरे कोणी नसून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना आहेत. त्यांनी स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले.

विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. 'कुर्बानी', 'द बर्निंग ट्रेन' आणि 'चांदनी' यांसारख्या हिट चित्रपटांनी विनोद खन्ना यांनी बॉलिवूड गाजवले. त्यांच्या हँडसम लूकचे चाहते दिवाने होते. विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये रिलीज झालेल्या 'मन का मीत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली, या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

विनोद खन्ना यांनी २७ एप्रिल २०१७ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाच्या दोन वर्ष आधीच त्यांनी 'दिलवाले' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा छापला. 'दिलवाले' चित्रपट 2015 ला रिलीज झाला. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल खान, वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत झळकले. या चित्रपटाने जगभरात अंदाजे ₹३७२–३८८ कोटींची कमाई केली. या चित्रपटात विनोद खन्ना यांनी शाहरुख खानच्या वडिलांची म्हणजे रणधीर बक्षी यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांचे खूप कौतुक देखील करण्यात आले.

विनोद खन्ना यांनी करिअरच्या सुरूवातीला खूप हलाखीची परिस्थितीतून यश मिळवले. १९८० च्या दशकात बॉलिवूडमधून काही काळासाठी निवृत्ती घेऊन अमेरिकेतील ओशो यांच्या आश्रमात (रजनीशपुरम) राहत असताना दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांनी स्वच्छतागृहे साफ केली आणि इतर शारीरिक कष्टाची कामेही केली. त्यांनी 'काम हीच साधना' (work as meditation) ही जीवनशैली अंगीकारली. प्रसिद्धीपासून दूर राहून साधेपणाचे जीवन जगण्यासाठी त्यांनी 'स्वामी विनोद भारती' हे नाव धारण केले आणि तिथे माळी, स्वच्छता कर्मचारी म्हणून साधारणपणे पाच वर्षे काम केली. आश्रमातून आल्यावर अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यात 'दयावान' आणि 'क्षत्रिय' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होता. त्याचा 'चांदनी' हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Mumbai Crime : फैय्याजला मुंबईतील ३० हजार नागरिकांना का मारायचं होतं? चौकशीदरम्यान सांगितलं खरं कारण

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

SCROLL FOR NEXT