Famous Actor  saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor : मधुचंद्राच्या रात्रीचा सीन करताना अभिनेता थरथर कापत होता, नंतर ढसाढसा रडला; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

Actor Cried During Shooting Of First Night Of Marriage : सोशल मीडियावर सध्या एका वेब सीरिजची तुफान चर्चा आहे. यात अभिनेता लग्नाची पहिल्या रात्रीचे शूटिंग करताना ढसाढसा रडला. नेमकं घडलं काय, पाहा.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेता मधुचंद्राच्या रात्रीचा सीन करताना खूप रडला, तो थरथर कापत होता.

सह- कलाकार अभिनेत्रीने थरारक किस्सा सांगितला.

सध्या ती वेब सीरिज सोशल मीडियावर खूप गाजत आहे.

चित्रपट, मालिका, नाटक , सीरिजमधून अनेक वेळा समाजात घडणाऱ्या गंभीर विषयांवर बोले जाते. तसे विषय सीरिजचा भाग असतात. सध्या तशीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अलिकडेच 'चिरैया' ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे, ज्यामध्ये वैवाहिक बलात्कार, लग्नानंतर पतीकडून होणारी जबरदस्ती, पुरुष प्रधानता आणि महिलांची संमती यांसारख्या गंभीर विषयांना हात घालण्यात आला आहे. सीरिजमधील लग्नाच्या रात्रीचे दृश्य, ज्यामध्ये अरुण आपल्या पत्नीवर जबरदस्ती करतो हे हृदयद्रावक होते. या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत प्रसन्न बिष्ट, सिद्धार्थ शॉ झळकले आहेत.

सिद्धार्थ शॉला अनेक टीकांना सामोरे जावे लागले. मात्र चित्रीकरण करताना सिद्धार्थची अवस्था खूप वाईट होती. तो खूप थरथर कापत होता आणि रडला होता. 'फिल्मी ज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत प्रसन्न बिष्ट म्हणाली की, "जेव्हा आम्ही हनिमूनच्या दृश्याचा पहिला शॉट घेतला, तेव्हा सिद्धार्थ रडू लागला. तो थरथर कापू लागला. त्याला बरे वाटावे म्हणून आम्हाला काही वेळासाठी शूटिंग थांबवावे लागले, त्यानंतरच आम्ही पुढे जाऊ शकलो."

जेव्हा सिद्धार्थला याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, "मी रडलो तेव्हा ती कोणती भावना होती हे मला माहित नाही. मला माहित असतं तर बरं झालं असतं. आम्ही आधीच सराव केला होता. ते एका कोरिओग्राफीसारखं होतं. मला माहित होतं की तो अभिनय होता, पण त्या क्षणी मला काय झालं, माझ्या मनात कोणती भावना निर्माण झाली, हे मला अजूनही माहित नाही. केवळ त्या दृश्याची कल्पना करूनच मी थरथर कापत होता. माझी तब्येत खूप बिघडली होती."

पुढे सिद्धार्थ बोलला की, "मी आणि प्रसन्ना एकमेकांना ५ वर्षांपासून ओळखतो. आम्ही एकमेकांसोबत comfortable होतो. आम्ही शूटिंगपूर्वी तालीमही केली होती. हे एखाद्या कोरिओग्राफीप्रमाणे होते..."'चिरैया' २० मार्च रोजी जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. यात दिव्या दत्ता, प्रसन्न बिष्ट, सिद्धार्थ शॉ आणि संजय मिश्रा यांच्यासोबत टिनू आनंद, फैसल रशीद आणि सरिता जोशी यांच्याही भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Mobile Recharge Under 200: फक्त 199 रुपयांत 28 दिवसांची वैधता; Jio, Airtel, Vi चा जबरदस्त रिचार्ज प्लान

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT