Shreya Maskar
ऊटी हे तामिळनाडूतील निलगिरी पर्वतरांगेत वसलेले एक अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.
ऊटी चहाच्या मळ्यांसाठी, नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि थंड वातावरणासाठी ओळखले जाते. याला 'हिल स्टेशन्सची राणी' असेही म्हणतात.
उटीला ट्रेकिंग, बोटिंग, 'टॉय ट्रेन'चा प्रवास आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. येथे धबधबे, बॉटॅनिकल गार्डन्स पाहायला मिळतात.
ऊटीमध्ये ब्रिटिश वसाहतकालीन वास्तुकला आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर मिलाफ दिसतो. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.
ऊटीमध्ये बोटॅनिकल गार्डन्स, ऊटी लेक, डोडाबेट्टा शिखर, आणि प्राचीन मंदिरे यांसारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
बोटॅनिकल गार्डनर, रोझ गार्डन येथे तुम्हाला सुंदर रंगीबेरंगी फुल पाहायला मिळतील. तसेच हिवाळ्यात येथील थंडगार वातावरण पाहून तुम्ही भारावून जाल.
ऊटी हे स्वस्तात मस्त आणि सुंदर हनिमून लोकेशन आहे. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. तसेच सर्व बुकिंग ऑनलाइन करून ठेवा, जेणेकरून पैसे कमी लागतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.