Mumbai Pune Tourism : मुंबई-पुण्याहून हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' पर्यटनस्थळ, समुद्राच्या पाण्यात करा मनसोक्त मजा

Shreya Maskar

रायगड

दिवेआगर हा रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध, शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे, जो स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी, नारळाच्या बागांसाठी आणि ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

beach | google

दिवेआगर

दिवेआगर मुंबई-पुणेकर लोकांसाठी एक लोकप्रिय वीकेंड गेटवे बनला आहे. येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. कपल शूटसाठी हे सुंदर लोकेशन आहे.

beach | google

जलक्रीडा

दिवेआगर जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. येथे बनाना राइड, जेट स्कीइंगसारखे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही येथे मित्रांसोबत तुफान मजा-मस्ती करू शकता.

Water Sports | google

परिसर

दिवेआगर येथील श्री सुवर्ण गणेश मंदिर त्याच्या सोन्याच्या गणपतीच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येते.

beach | google

फणसाड वन्यजीव अभयारण्य

दिवेआगरजवळचे फणसाड वन्यजीव अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे, जिथे घनदाट जंगल, जैवविविधता आणि विविध पक्षी व वन्यजीव आढळतात.

Wildlife Sanctuary | google

पर्यटन स्थळे

दिवेआगर जवळ श्रीवर्धन, हरिहरेश्वर , मुरुड-जंजिरा किल्ला , वेळस बीच , कुडा लेणी , कोंडिवली बीच ही ठिकाणे आहेत.

beach | google

कधी भेट द्याल?

पावसाळा आणि हिवाळ्यात तुम्ही दिवेआगरला भेट द्या. दिवेआगर बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

beach | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

beach | google

NEXT : हिवाळ्यात फिरण्यासाठी 'हे' ऑफबीट डेस्टिनेशन परफेक्ट, कुटुंबासोबत लुटा सुट्टीचा आनंद

Maharashtra Tourism | yandex
येथे क्लिक करा...