Shreya Maskar
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड हा डोंगरी किल्ला आहे. हिवाळ्यात येथे पिकनिकला नक्की जा.
औरंगाबाद जिल्ह्यातील वेताळवाडी किल्ला वेताळवाडी धरणाच्या जवळ असल्यामुळे 'वेताळवाडी किल्ला' म्हणून ओळखला जातो आणि या किल्ल्याला स्थानिक लोक वसईचा किल्ला असेही म्हणतात.
औरंगाबाद जिल्ह्यातील वेताळवाडी किल्ला हा ट्रेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही येथे नवीन वर्षात नक्की भेट द्या.
वेताळवाडी किल्ला अजिंठा-सातमाळा रांगेत असून, सुंदर देखावे, ऐतिहासिक तटबंदी, बुरुज आणि रुद्रेश्वर लेण्यांसारखी ठिकाणे जवळ असल्याने इतिहासप्रेमी आणि गिर्यारोहकांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वेताळगड (वेताळवाडी किल्ला) या किल्ल्याचा मुख्य दरवाजा 'जंजाळा दरवाजा' म्हणून ओळखला जातो आणि त्याला भव्य तटबंदी व बुरुज आहेत.
वेताळगड किल्ल्याजवळ वेताळवाडी धरण आणि रुद्रेश्वर लेणी ही जवळची ठिकाणे आहेत. तुम्ही येथे फॅमिली ट्रिपसाठी येऊ शकता.
'छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन' स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने गडाच्या पायथ्याशी जाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.