Mumbai SAAM TV
मनोरंजन बातम्या

Mumbai : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, काठीने मारहाण, हायप्रोफाईल सोसायटीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Attacked On Famous Actor : टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर हल्ला झाला आहे. त्याला काठीने मारहाण करण्यात आली आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्यावर हल्ला झाला आहे.

मारहाणीचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्यावर काठीने मारहाण करण्यात आली आहे.

मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला काठीने मारहाण करण्यात आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना, इतर कलाकार मंडळींना मोठा धक्का बसला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीने अनुज सचदेवाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अनुज सचदेवाला (Anuj Sachdeva) त्याच्या राहत्या सोसायटीमध्ये मारहाण झाली आहे. अनुज सचदेवा हा मुंबईतील गोरेगाव येथील हायप्रोफाईल सोसायटीत राहतो. अनुजने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याला सोसायटीमधील एक रहिवासी काठीने मारताना दिसत आहे. सोसायटी परिसरातच पडलेली एक काठी उचलून त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. तसेच तो रहिवासी अभिनेत्याला शिवीगाळ देखील करत आहे. व्यक्ती प्रचंड संतापला होता. अभिनेत्याच्या मदतीला सोसायटी वॉचमॅन धावले. व्हिडिओमध्ये एका महिलेचाही आवाज येत आहे. जी मदतीसाठी वॉचमनला बोलावत आहे.

अनुज सचदेवाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "ही व्यक्ती मला किंवा माझ्या मालमत्तेचे काही नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मी हा पुरावा पोस्ट करत आहे...सोसायटीच्या पार्किंगमध्ये चुकीच्या ठिकाणी लावलेल्या त्याच्या गाडीबद्दल सोसायटीच्या ग्रुपमध्ये कळवल्यामुळे त्याने माझ्यावर आणि माझ्या कुत्र्यावर काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे." त्या व्यक्तीने अनुज सचदेवाच्या कुत्र्याला देखील मारले. कुत्र्याचा आवाज व्हिडीओत ऐकू येत आहे.

अनुज सचदेवाने पोस्टमध्ये सोसायटीचा पत्ता तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या घराचा पत्ता सांगितला आहे. तसेच विनंती करत म्हणाला की, " कृपया ही माहिती अशा लोकांसोबत शेअर करा जे कारवाई करू शकतील..." अनुज सचदेवाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कलाकार, चाहते , नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहे. तसेच चाहते त्याच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत. हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: 'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT