Fakat Marathi Film 1st Week Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Fakat Box Office Collection: ‘फकाट’नं पहिल्या आठवड्यातच कमावला कोटींचा गल्ला, बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट सुसाट...

Fakat Marathi Film 1st Week Collection: हायली कॉन्फिडेन्शिअल असलेला ‘फकाट’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांकडूनच चित्रपटाचे कौतुक होत आहे.

Chetan Bodke

Fakat Film 1st Week Box Office Collection: हायली कॉन्फिडेन्शिअल असलेला ‘फकाट’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळयांकडूनच चित्रपटाचे कौतुक होत आहे. सगळ्याच थिएटरमध्ये ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकवणाऱ्या या चित्रपटाने वीकेंडला बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ९१.२६ लाखांचा गल्ला जमवला आहे. जबरदस्त विनोदाने भरलेला 'फकाट' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. या चित्रपटाबद्दल समीक्षकांकडून, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे ‘फकाट’च्या निमित्ताने बऱ्याच काळाने मराठी सिनेसृष्टीला असा धमाकेदार चित्रपट पाहायला मिळाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ‘फकाट’ अवघ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी होत आहे. शुक्रवारी १५. २१ लाख, शनिवारी २८.३३ लाख तर रविवारी या चित्रपटाने ४७.७२ लाखांची कमाई केली आहे. प्रेक्षकांचे फक्कड मनोरंजन करणारा हा चित्रपट एलओसीसारख्या संवेदनशील विषयावर बेतलेला चित्रपट आहे. त्याचे गांभीर्य जाऊ न देता, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनमुराद हसवणारा हा ‘फकाट’ चित्रपट सरतेशेवटी प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, “प्रेक्षकांकडून मिळणार प्रतिसाद खरंच आनंददायी आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम मनाला उभारी देणारे आहे. या चित्रपटासाठी प्रत्येकानेच घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान आहे. हा एक मनोरंजनात्मक चित्रपट असून कुटुंबासमवेत पाहावा असा आहे. अनेकांनी मला फोन, मेसेजद्वारे चांगला चित्रपट असल्याची पावती दिली. आशा आहे की, येणारे पुढील अनेक आठवडे प्रेक्षकांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.” (Marathi Film)

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित, श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. (Marathi Actors)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT