Actress Athiya Shetty and Indian cricketer K.L. Rahul's wedding gifts Saam Tv
मनोरंजन बातम्या

KL Rahul-Athiya Shetty Wedding: आथिया- राहुलला लग्नात मिळाल्या अलिशान वस्तु, अखेर घरातल्यांनी उघडले त्यामागील गुपित...

अथिया शेट्टी आणि के.एल.राहुलला अनेकृ महागडे भेटवस्तू मिळाल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Athiya- K.L. Rahul: नुकतेच अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल. राहुलने गाठ बांधली. खंडाळ्यातील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर काही थोड्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ पार पडला. यावेळी अथिया आणि के.एल. राहुलचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. सोबतच लग्नातील काही फोटोही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. पण या सर्वात जास्त चर्चा होते ती, त्यांच्या महागड्या गिफ्ट्सची.

अथिया शेट्टी आणि के.एल.राहुलला अनेकृ महागडे भेटवस्तू मिळाल्याची माहिती सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. या जोडप्याला त्यांच्या लग्नात एकापेक्षा एक महागड्या वस्तू मिळाल्याची चर्चा सुरू आहे. या भेटवस्तूंमध्ये अनेक महागड्या गोष्टी देखील आहेत. अथिया आणि राहुलला मुंबईत ५० कोटींचे अलिशान घर, अलिशान कार, महागडे घड्याळ आणि बाईक्स सोबतच डायमंड ब्रेसलेट.या भेट वस्तू आथिया- राहुलला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींसह काही क्रिकेटर्सने दिले आहेत.

या भेटवस्तूंबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीच तथ्य नसल्याचे कुटुंबाने सांगितले. याबाबत एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीप्रमाणे, या जोडप्याच्या कुटुंबीयांकडून माहिती घेतली असता, त्यांनी या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून त्यात तथ्य नसल्याचे सांगितले.

आता तरी, अथिया आणि के.एल. राहुलच्या लग्नात आलेल्या गिफ्ट्सच्या चर्चांना आता तरी पुर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. अथिया आणि के.एल. राहुलने 23 जानेवारीला लग्नगाठ बांधली. अलीकडेच अथिया शेट्टी आणि सुनील शेट्टीने लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या भावनिक पोस्ट्सही चर्चेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT