Sajid Khan Kanishka Soni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanishka Soni: अभिनेत्री कनिष्का सोनीचा मोठा खुलासा, साजिद खानने तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

'मी टू' सारखे आरोप असणाऱ्या साजिद खानवर आणखी एक आरोप. अभिनेत्रीला चित्रपटात काम देतो सांगून बोलावले घरी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता साजिद खान हा बिग बॉस 16 (Bigg Boss) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्याला शोमधून बाहेर काढण्याची सतत मागणी केली जात आहे. MeToo सारखे आरोप असलेला साजिद खान बिग बॉसच्या घरात गेल्याने अनेक अभिनेत्री त्याचा विरोध करत आहेत. 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्री कनिष्का सोनी हिनेही साजिद खानबाबत मोठा खुलासा केला आहे.

'दिया और बाती हम' फेम कनिष्का सोनीने (Kanishka Soni) तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. व्हिडीओमध्ये कनिष्क म्हणतो- काही दिवसांपूर्वी मी मीडियाला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये मी सांगितले होते की एक दिग्दर्शक-निर्माता आहे ज्याने मला घरी बोलावले आणि मला तुझे पोट बघायचे आहे, असे म्हटले होते. तेव्हा मी म्हणाले की, मला कोणत्याही दिग्दर्शकाचे आणि निर्मात्याचे नाव घ्यायचे नाही.

मला समजले की माझ्याशी वाईट कृत्य करणारा दिग्दर्शक आणि निर्माता 'बिग बॉस'चा स्पर्धक आहे. मला आधी त्याचे नाव घ्यायचे नव्हते. मला त्याचे नाव सांगताना इतकी भीती वाटत आहे की मी भारतात यायला सुद्धा घाबरत आहे. कारण हे लोक भरपूर पॉवरफुल आहेत. हे लोक काहीही करू शकतात. मला नाव सांगायला भीती वाटत आहे तरीही मी आज नाव सांगणार. कारण जेवढं फेम आणि प्रसिद्धी त्यांना 'बिग बॉस'च्या माध्यमातून मिळत आहे, तो त्या लायक नाही. त्याचे नाव आहे साजिद खान. (Sajid Khan)

कनिष्काने सांगितले, २००८ साली जेव्हा ती दोन रिऍलिटी शो करत होती तेव्हा तिची ओळख साजिद खानबरोबर झाली होती. तेव्हा तिला खूप पैसे मिळत नव्हते, म्हणून ती सेलेब्रिटींच्या मुलाखती घ्यायची. तेव्हा तिने एक दिवस मुलाखतीसाठी साजिद खानला कॉल केला होता. त्याने तिला साजिद नाडियाडवालाच्या ऑफिसमध्ये बोलावले. ऑफिसच्या बाल्कनीमध्ये तिने त्याची मुलाखत घेतली होती. तेव्हा तिने त्याला 'मला अभिनय क्षेत्रात करियर करायचे तुम्ही माझी मदत कराल का?' असे विचारले होते. तेव्हा त्याने तिला त्याच्या घरी बोलावले. तिला वाटले हिरोईन व्हायचे असेल तर रिस्क घ्यावीच लागेल असा विचार करून ती त्याच्या घरी गेले.

जेव्हा त्याच्याशी बोलण्यासाठी ती त्याच्या खोलीत गेली तेव्हा त्याने तिला उभे राहायला सांगितले. त्याने तिची फिगर बघितली आणि तू परफेक्ट आहेस असे सांगितले. तेव्हा त्याने एक चित्रपट बनवत आहे आणि त्यात दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) घेत आहे. तुझी फिंगर चांगली आहे. तू हिरोईन मटेरियल आहेस, असे तिला सांगितले. त्यानंतर त्याने तिला तिचे पोट बघायचे आहे, काळजी करू नको मी तुला हात लावणार नाही, असे सांगितले. तिने हात जोडून त्यांना सांगितले की मी माझे पोट नाही दाखवू शकत. त्यावर साजिद खानने ठीक आहे मी तुला माझ्या चित्रपटात घेऊ शकत नाही असे म्हटले.

कनिष्काला 'दीया और बाती हम'च्या वेळी साजिद खान पुन्हा भेटला. तिला वाटले आता तरी तो बदलला असेल. मी पुन्हा चित्रपट (Film) काम मागण्यासाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा तो तिला म्हणाल तू साधी मुलगी आहेस. मला माझ्या चित्रपटात बोल्ड मुलगी हवी आहे. हे लोक मारून टाकतील म्हणून तिला नाव सांगायला सुद्धा भीती वाटत आहे. त्याला माझाशी लग्न करायचे होते. तो तिला म्हणायचं की, मला अशा मुलीशी लग्न करायचे आहे, जी मी सांगेन ते करेल.

तिला सलमान खानकडून (Salman Khan) ही अपेक्षा नव्हती. तिला समजत नाहीये मुलींचा छळ करणाऱ्याला, त्यांना मारणाऱ्याला शोमध्ये कसे घेतले. साजिद खानचे सत्य सांगताना ती खूप भावुक झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, पूस नदीला पूर

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

SCROLL FOR NEXT