मुंबई: उर्वशी रौतेला सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असते. उर्वशी तिच्या पोस्ट मधून तिच्या भावना व्यक्त करत असते. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ पाहून यूजर्सनी तिला ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) अनेकदा जोडले आहे. अनेकांनी उर्वशीवर ऋषभ पंतला स्टॉक केल्याचा आरोपही केला आहे. या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देत उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
उर्वशी तिच्या पोस्टमुळे ट्विटरवर दररोज ट्रेंड करत असते. उर्वशीला फॉलो करणार्यांचे म्हणणे आहे की ती ऋषभ पंतला स्टॉक करते. याआधीही त्यांच्यावर अनेक मीम्स बनवण्यात आले आहेत. अखेर उर्वशीने तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ (Video) शेअर करत उर्वशीने लिहिले आहे, आधी इराणमध्ये, महसा अमिनी आणि आता भारतात, मला स्टॉकर म्हटले जात आहे. कोणालाच माझी पर्वा नाही. तसेच मला कोणीही साथ देत नाही. एक सशक्त स्त्री तीच आहे जी भावना समजून मनापासून प्रेम करते. तिच्या हास्याप्रमाणेच तिचे अश्रूही आपलेसे वाटतात. ती नाजूक आहे तशीच मजबूत आहे. स्त्री ही जगाला मिळालेली देणगी आहे.
उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण आता दोघेही एकत्र नाहीत. काही काळापूर्वी दोघांनीही इंस्टाग्राम पोस्टद्वारे एकमेकांना लक्ष केले होते. त्या दोघांमधील संभाषण इंस्टा पोस्टच्या माध्यमातून होत असते. जेव्हा ऋषभ पंत टी-20 वर्ल्ड कपसाठी (World Cup) ऑस्ट्रेलियाला गेला होता तेव्हा उर्वशीही तिथे पोहोचली होती. यानंतर दोघांवरचा लोकांचा संशय अजून वाढला.
हे प्रकरण इतके पुढे गेले की उर्वशीला तिचे स्पष्टीकरण देण्यासाठी व्हिडिओ शेअर करावा लागला. लोकांना उर्वशीचा मुद्दा समजेल आणि तिचे चाहते तिला पाठिंबा देतील अशी अपेक्षा करूया.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.