Alia- Ranveer Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Alia- Ranveer Viral Video: रणवीरने आलियाला कॅमेऱ्यासमोरच दिला धक्का; अभिनेत्याचे कृत्य पाहून अभिनेत्री बुचकळ्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rocky And Rani Kii Prem Kahani: करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटानं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असताना अभिनेता रणवीर आणि आलिया यांच्या केमेस्ट्रीला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. गली बॉय चित्रपटानंतर रणवीर आणि आलिया हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रदर्शित झाल्यानंतरही रणवीर सिंग आणि आलिया भट्ट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेता रणवीरच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.(Entertainment Marathi News)

व्हायरल व्हिडीओमध्ये, रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि करण जोहर एकत्र दिसत आहेत. फंकी लूकमध्ये या तिघांनीही मॅचिंग स्वेटशर्ट आणि ट्राउजर परिधान केले आहेत. मजा मस्ती करताना रणवीर आलियाला धक्का देतो आलिया घाबरते आणि 'माझ काय चुकलं' असं म्हणते तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. रणवीर,आलियासह करणही धमाल, मस्तीच्या मूडमध्ये व्हिडीओमध्ये दिसतो आहेत. सोशल मीडियावर यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाल आहे. तो कधी आंनदात आलियाला फिरवताना दिसतो तर कधी तो स्वतःच्याच धुदींत नाचताना दिसतो आहे. व्हायरल व्हिडीओवर दोघांमधील बॉन्ड पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या जोडीला सर्वोत्कृष्ट म्हंटले आहे, तर अनेकांनी प्रमोशनसाठी ही मस्ती सुरू असल्याचे म्हंटले आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. माहीतीनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 60 कोटींहून अधिकचा गल्ला जमा केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT