Entertainment News: मंडणगडच्या 'झुंजुमुंजु'ची आंतरराष्ट्रीय भरारी 
मनोरंजन बातम्या

Entertainment News: मंडणगडच्या 'झुंजुमुंजु'ची आंतरराष्ट्रीय भरारी

एखादं सुखद गोड स्वप्नं पडावं आणि ते अथक प्रयत्नांनी सत्यात उतरावं, असा हा झुंजुमुंजुचा प्रवास सुरू आहे. रस्ता अवघड तरी त्यावर चालण सुखद असल्याचे टीमकडून सांगण्यात येते. मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ध्येयवेड्या तरुणांनी एकत्रित येऊन ही समाजप्रबोधनात्मक कलाकृती घडवली आहे

Amit Golwalkar

(सचिन माळी)

मंडणगड : अंधश्रद्धा निर्मूलन हे दिशाभूलीपासून समाजाला वाचवण्याचे एक प्रभावी साधन आहे. अघोरी प्रथेवर आघात करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शिक्षणाच्या माध्यमातून भाष्य करणारा ' झुंजुमुंजु' लघुपट (Movie) आता भारत, कोलकत्ता, मुंबई, पुणे अशा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप पाडत असून ही वाटचाल उत्तरोत्तर प्रकाशमान होत आहे. (Entertainment News Marathi Zhunjumunju movie in international festivals)

मंडणगडमधील तरुणांनी बनवलेला हा लघुपट (Short Film) कोल्हापूर, औरंगाबाद या देशांतर्गत फेस्टिव्हलमध्ये कौतुकास पात्र, पुरस्कार विजेता ठरल्यानंतर आता दी सिनेमा इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल कोलकता, भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मुंबई शॉर्टफिल्म फेस्टिवल, पुणे इंटरनॅशनल शॉर्टफिल्म अॅवॉर्ड या चार फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑफिशियल सिलेक्शनने आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.

एखादं सुखद गोड स्वप्नं पडावं आणि ते अथक प्रयत्नांनी सत्यात उतरावं, असा हा झुंजुमुंजुचा प्रवास सुरू आहे. रस्ता अवघड तरी त्यावर चालण सुखद असल्याचे टीमकडून सांगण्यात येते. मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ध्येयवेड्या तरुणांनी एकत्रित येऊन ही समाजप्रबोधनात्मक कलाकृती घडवली आहे.

यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनय सादर केला आहे. तांत्रिक, मांत्रिक, वैदू, बुवा, बाबा, भगत, नवस, गंडेदोरे, जादूटोणा, ताईत, नरबळी, पशुबळी यांसारख्या अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अघोरी प्रथेवर शिक्षणाचे महत्व सांगून आघात करण्यात आला आहे.

हे देखिल पहा-

या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन गणेश माळी यांनी केले आहे. पंचरत्न व धर्मी प्रोडक्शन प्रस्तुत शॉर्टफिल्मचे कॅमेरा दिग्दर्शन, एडिटिंग- अभिषेक पाडेकर, निर्माते- सुशील मोरे, विकास जाधव, सहनिर्माता-विरेश जाधव, ग्राफिक्स-विश्वनाथ शिंदे, प्रसिद्धी-विधान अतुल, कला- मयुरेश माळी, वेशभूषा, रंगभूषा- अंकिता माळी यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. संपूर्ण चित्रीकरण पालेकोंड या निसर्गरम्य गाव, परिसरात करण्यात आले आहे.

एखाद्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टीवर खात्री न करून घेता, तर्कवितर्क बाजूला ठेवून आंधळेपणाने विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा. झुंजुमुंजु टीमने समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या हेतूने लघुपटातून केलेल्या प्रयत्नांची दखल नॅशनल आणि इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमधून घेण्यात आली. देशांतर्गत फिल्म फेस्टिवलमध्ये कौतुकास्पद आणि पुरस्कारविजेती झुंजुमुंजु परदेशातीलही फेस्टिव्हलमध्ये कौतुकास पात्र ठरली, याचा आम्हा संपूर्ण टीमला खूप आनंद झाला आहे - गणेश माळी, लेखक/दिग्दर्शक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT