Zara Hatke Zara Bachke Instagram
मनोरंजन बातम्या

Zara Hatke Zara Bachke Day 10 Box Office Collection:सारा आणि विक्कीच्या चित्रपटाची 'हटके' कमाई, दहा दिवसांतच केला कोटींचा टप्पा पार

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ एका आठवड्याच्या कालावधीतच बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Zara Hatke Zara Bachke Movie: अभिनेता विकी कौशल्य आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ एका आठवड्याच्या कालावधीतच बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटांबद्दल काहीही अपेक्षा नव्हत्या. मात्र समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्यानंतर, विकी आणि साराची रोमँटिक केमेस्ट्री चाहत्यांच्या पंसतीस आली आहे. चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या चित्रपटात पहिल्यांदाच अभिनेता विकी आणि अभिनेत्री साराची जोडी एकत्रित ऑनस्क्रीन पाहायला मिळाली असून प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली आहे. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे. कमाईबद्दल बोलायचे झाले तर १० दिवसांतच चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.(Entertainment Marathi News)

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यातच २२. ५९ कोटींची कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ५.४९ कोटींची कमाई केली, दुसऱ्या दिवशी ७.२० कोटी, तिसऱ्या दिवशी ९.९० कोटी आणि चौथ्या दिवशी ४.१४ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने विक्रम कायमच ठेवला.

प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाने २६. १७ कोटींचा गल्ला जमवला आहे. विकेंडला म्हणजेच रविवारी चित्रपटाने आपली जादू दाखवली आहे. शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली असून ५.७६ कोटींचा टप्पा पार केला आहे. केवळ १० दिवसांच्या कमाईनेच बॉलिवूडला मोठे सरप्राईज दिले आहे. १० व्या दिवशी म्हणजेच रविवारी ७.२ कोटी रुपयांचे ग्रँड कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ५३.५५ कोटींवर गेली आहे.

'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट अखेर ५० कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी झाला असून बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज यांनी केली आहे. 'जरा हटके जरा बचके'मध्ये इनामुलहक, सुष्मिता मुखर्जी, नीरज सूद, राकेश बेदी आणि शरीब हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT