मुंबई: 'बिग बॉस मराठी ४' (Bigg Boss) सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. 'बिग बॉस'च्या पहिल्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची शाळा सुद्धा घेतली. वीकेंडच्या चावडीवर कोणी हिरो ठरलं तर कोणी झिरो. चावडीनंतर येणारा दिवस खास 'बिग बॉस'च्या (Bigg Boss Marathi) स्पर्धकांसाठी खास असतो. कारण प्रत्येक स्पर्धकाला स्वतःबद्दल नवीन काहीतरी कळलेले असते. आजच्या भागात स्पर्धकांच्या भेटीला सुपरहिरो येणार असल्याचे 'बिग बॉसने सांगितले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात वीकेंडला खूप ड्रमा (Drama) पाहायला मिळाला. निखिल राजेशिर्केला त्याच्या अतिचांगल्या वागणुकीबद्दल ऐकून घ्यावे लागले. अपुर्वाकडे आणि समृद्धीकडे प्रेक्षकांनी चुगली केली. पहिल्या चावडीवर किरण मानेला सगळ्यांनीच झिरो ठरवले. त्यात किरण मानेला दादा म्हणणारा योगेश जाधवचा यात समावेश होता. किरण माने एलिमिनेट सुद्धा झाले त्यांना एलिमिनेट करण्यामध्ये सर्व स्पर्धांसह त्यांना बाबा म्हणणाऱ्या त्यांच्या मुलीचा म्हणजे समृद्धीचा सुद्धा हात होता. त्यामुळे 'बिग बॉस'च्या घरामध्ये नात्यांपेक्षा खेळाला जास्त महत्व आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो त्यांच्या सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. त्यात स्पर्धकांना ४५ मिनिटामध्ये तयार होण्यासाठी 'बिग बॉस' सांगत आहेत. सगळ्या स्पर्धकांना तयार होऊन येणाऱ्या पाहुण्याचे म्हणजे सुपरहिरोचे स्वागत करायचे आहे. सर्व स्पर्धकांची ४५ मिनिटामध्ये तयार होण्यासाठी धावपळ सुरू होते. सर्व स्पर्धक ४५ मिनिटात तयार होण्याचा टास्क पूर्ण करता की नाही हे आजचा भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात कोणत्या सुपरहिरोची एन्ट्री होणार हे पाहण्यासाठी स्पर्धक उत्सुक आहेत. या सुपरहीरोसाठी स्पर्धकांना या टास्कला सामोरे जावे लागले आहे. तुम्हाला काय वाटत कोण असेल 'बिग बॉस'च्या घरात येणार सुपरहिरो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.