सध्या बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट धुमाकूळ घालत आहेत. यात बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi ) 'ग्राउंड झिरो'(Ground Zero ) आणि अभिनेता प्रतीक गांधीचा (Pratik Gandhi ) 'फुले' (Phule ) चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट 25 एप्रिलला रिलीज झाले आहेत. हे चित्रपट रिलीज होऊन फक्त दोन दिवस झाले आहे. दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन खूप संथ गतीने होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपट वीकेंडला कोणती जादू करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 1.90 कोटी रुपये कमवले आहे. वीकेंडला चित्रपटाचे कलेक्शनमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दोन दिवसांमध्ये 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने एकूण 3.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपट रविवारी किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ग्राउंड झिरो' चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीत प्रतीक गांधीच्या 'फुले' चित्रपटाला मागे टाकले आहे.
'ग्राउंड झिरो'मध्ये इमरान हाश्मीसोबतमराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) देखील झळकली आहे. ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इमरान हाश्मीचा 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये दहशतवादी गाझी बाबा कसा मारला गेला हे दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील इमरान हाश्मीच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. 'ग्राउंड झिरो' चित्रपटात इमरान हाश्मी, सई ताम्हणकरसोबत ललित प्रभाकर, मुकेश तिवारी, दीपक परमेश, रॉकी रैना, झोया हुसैन हे कलाकार देखील झळकले आहेत.
अभिनेता प्रतीक गांधीचा 'फुले' चित्रपट कायम चर्चेत राहीला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'फुले' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 24 कोटींची कमाई केली तर भारतात 21 लाख रुपये कमावले आहेत. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास 26 लाख रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत 'फुले' चित्रपटाने 47 लाखांचा व्यवसाय केला आहे.
आता 'फुले' चित्रपटाच्या रविवारच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते असे चित्र दिसत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'फुले' आणि इमरान हाश्मीच्या 'ग्राउंड झिरो' चित्रपटाची टक्कर पाहायला मिळत आहे. 'फुले'चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात महात्मा फुले यांच्या भूमिकेत प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पत्रलेखा (Patralekha ) आहे. 'फुले' चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.