Emraan Hashmi actor OG Antagonist Announcement Instagram
मनोरंजन बातम्या

Emraan Hashmi South Cinema Debut: बॉलिवूडनंतर इम्रान हाश्मीची टॉलिवूडमध्ये एन्ट्री, ‘या’ तेलुगू चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

Emraan Hashmi In OG Telugu Film: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी लवकरच तेलुगू चित्रपटात डेब्यू करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Emraan Hashmi actor OG Antagonist Announcement: दिग्दर्शक सुजीतचा गँगस्टर ड्रामा ‘ओजी’ ची घोषणा झाल्यापासून चित्रपट सध्या चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटांपैकी एक, ‘OG’ मध्ये पॉवर स्टार पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू असून त्यातील काही भाग मुंबईत शूट करण्यात आले आहे.

निर्माते आता चित्रपटाच्या शूट शेड्यूलला सुरुवात करण्यासाठी हैदराबादला जाणार असल्याचं समजतंय. चित्रपटाच्या शूटिंगबद्दल एक महत्वाची अपडेट समोर येत आहे, बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी या चित्रपटाचा एक भाग होणार असल्याचं समजतंय.

तेलुगू ड्रामा चित्रपटात इम्रान हाश्मी नेमेसिसच्या भूमिकेत दिसणार आहे. एक महत्त्वपूर्ण भूमिका तो या चित्रपटात साकारणार असल्याचं कळतंय. चित्रपटात इम्रान हाश्मी एक भूमिका साकारणार आहे आणि भारतभरातील सिनेप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी असणार आहे.

तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबाबत बोलताना इम्रान हाश्मी सांगतो, “दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत ‘OG’ या चित्रपटाद्वारे या नव्या प्रवासाला मी सुरुवात करत आहे आणि त्या साठी मी उत्सुक आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आकर्षक आहे आणि ती मला आव्हानात्मक भूमिका देते. मी पवन कल्याण सर, सुजीत, दानय्या सर आणि टीमसोबत काम करण्यास उत्सुक आहे, मला विश्वास आहे की आम्ही प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव तयार करू.”

अगदी अलीकडेच, निर्मात्यांनी तमिळ अभिनेत्री श्रीया रेड्डी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्याबद्दल अधिकृत घोषणा केली. थमन एसच्या संगीतासह, 'OG' ची निर्मिती DVV दानय्या, सुजीत यांनी DVV एंटरटेनमेंट्स बॅनरखाली लिखित आणि दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचीही प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Women's World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला मिळणार पुरुषांपेक्षाही जास्त बक्षीस, किती मिळणार प्राइस मनी?

Local Body Elections : महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; वारे बदलले, शिंदेंच्या शिवसेनेचा शिर्डीत भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू अमरावती जिल्ह्यात दाखल, शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत

Face Care: थंडीने गाल रखरखीत झालेत? मग त्वचा मुलायम होण्यासाठी आजच हे ३ घरगुती उपाय वापरून पाहा

ओलिस प्रकरणाआधी रोहित आर्यचा विद्यार्थ्यांसोबतचा ‘ऑडिशन’ व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT