Elvish Yadav  Instagram
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav Net Worth : 14 कोटींचं घर, लक्झरी कार कलेक्शन; युट्यूबर एल्विश यादवची एकूण मालमत्ता किती?

Elvish Yadav Net Worth News : काही दिवसांपूर्वी या प्रकरणी नोएडा पोलिसांनी सापांच्या विषासोबत ५ लोकांना अटक केली आहे. ८ नोव्हेंबरला रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आला होता.

Vishal Gangurde

Elvish Yadav latest News :

बिगबॉस ओटीटी विजेता, प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी एल्विशची सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. युट्युबर एल्विशने सापांच्या विषाचा रेव्ह पार्टीमध्ये वापर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी नोएडा पोलिसांनी सापांच्या विषासोबत ५ लोकांना अटक केली आहे. ८ नोव्हेंबरला रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात चर्चेत असणाऱ्या एल्विश यादवची एक मालमत्ता किती? जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

एल्विश यादव हा हरियाणाच्या गुरुग्रामचा राहणारा आहे. त्याने २०१६ साली युट्यूबर म्हणून सुरुवात केली. सध्या तो सोशल मीडिया स्टार आहे. तो यूट्युबच्या माध्यामातून कमाई करत आहे. त्याच्याजवळ कोटी रुपयांचं घर आहे. तसेच त्याच्याकडे लक्झरी कारचं कलेक्शन आहे.

१४ कोटींच्या अलिशान घरात राहतो एल्विश

काही महिन्यांपूर्वी एल्विश यादवने गुडगावच्या वजीराबादच्या चार मजली अलिशान घरात राहतो. त्याच्या घराची किंमत १२ ते १४ कोटी रुपये आहे. त्याचं घर १६ बीएचके आहे. दुबईमध्येही त्याचं ८ कोटी रुपयांचं घर आहे.

एल्विश हा युट्यूबशिवाय इन्स्टा आणि अन्य माध्यमातूनही कमाई करतो. बिगबॉस ओटीटीमध्ये सहभागी होण्यासाठी १५ ते २० लाख रुपये मिळाले होते. तर त्याला जिंकल्यानंतर २५ लाख रुपये मिळाले होते.

एल्विश यादवची मासिक कमाई आणि मालमत्ता किती?

एल्विशची मासिक कमाई १०-१५ लाख रुपये आहे. तर त्याची एकूण मालमत्ता ४० कोटी रुपयांच्या आसपास आहे. एल्विश यादव हा प्रत्येक व्हिडिओमागे ४ ते ६ लाख रुपयांची कमाई करतो. तसेच या व्यतिरिक्त इन्स्टा, जाहिरातीच्या माध्यमातूनही कमाई करतो.

एल्विशचं कार कलेक्शन

एल्विश यादव त्याच्या लाईफस्टाइलसाठी चर्चेत राहतो. त्याच्याजवळ १.४१ कोटी रुपयांची Porsche 718 Boxster कार आहे. तसेच त्याच्याकडे Hyundai Verna, टोयोटा फॉर्च्युनर आणि अन्य गाड्या आहे. त्याने ही मालमत्ता युट्यूबच्या माध्यमातून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

SCROLL FOR NEXT