Elvish Yadav  saam tv
मनोरंजन बातम्या

Elvish Yadav : "सब मान लिया तुझको..."; करोडपती सुंदरीच्या प्रेमात एल्विश यादव? मिठी मारली अन्..., पाहा VIDEO

Elvish Yadav Love Relationship : एल्विश यादव आपल्या लव लाइफमुळे चांगला चर्चेत आला आहे. तो टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोले जात आहे. नेमकी ती सुंदरी कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादव सध्या चर्चेत आला आहे.

एल्विश यादव टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोले जात आहे.

एल्विश यादवचा त्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत एक व्हिडीओ समोर आला आहे.

'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि अभिनेता एल्विश यादव कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता मात्र त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. अलिकडेच तो 'औकात के बहार' या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. नुकतेच त्याचे एक रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. ज्याचे नाव 'तेरे दिल में' असे आहे गाण्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

'तेरे दिल में' गाण्यात एल्विश यादव प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री जन्नत जुबैरसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खरोखरच मनमोहक आहे. गाण्यात दोघे गाडीवरून फिरताना, एकमेकांना मिठी मारताना तसेच रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. त्यांची ही केमिस्ट्री पाहून सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगची चर्चा पाहायला मिळत आहे. लोक गाण्यावर भरभरून कमेंटस करत आहेत. जन्नत जुबैर एक लग्जरी लाइफ स्टाइल जगते. ती कोट्यवधींची मालकीण आहे.

एका दिवसांत गाण्याला मिलियनमध्ये views मिळत आहे. एल्विश यादव आणि जन्नत जुबैर ही जोडी 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये देखील पाहायला मिळाली. गाण्यावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. "वाटतंय भाऊ प्रेमात पडला...", "क्यूट जोडी", "दोघांची केमिस्ट्री खूपच भारी...", "गाणे नक्कीच सुपरहिट आहे...", "दोघे एकत्र खूपच छान दिसतात..." अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे.

'तेरे दिल में' गाणे रितो रिबा यांनी गायले आहे. याचे बोल राणा सोटल यांनी लिहिले आहेत आणि रजत नागपाल यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात एल्विश आणि जन्नत एका जोडप्याच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. जिथे मुलीचे वडील तिला दुसऱ्याशी लग्न करण्यास भाग पाडतात तेव्हा ती मुलगी घर सोडून हिरोसोबत जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ticket Refund : रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती रक्कम परत मिळते? जाणून घ्या सविस्तर

Fry Pineapple Recipe: आंबट-गोड अननस फ्राय कसं बनवायचं? बघताच क्षणी तोंडाला येईल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी

Puri Recipe: Oil Free पुऱ्या खा, 'ही' रेसिपी लगेचच करा नोट

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT