Elvish Yadav  Saam TV
मनोरंजन बातम्या

Arrest Elvish Yadav: 'बिग बॉस ओटीटी' फेम एल्विश यादवला तातडीने अटक करा, नेटकऱ्यांची सोशल मीडियावर मागणी, नेमकं कारण काय ?

Elvish Yadav: 'बिग बॉस ओटीटी २'चा विनर एल्विश यादव नेहमीच या नाही तर त्या कारणामुळे चर्चेत राहतो. अशातच अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Elvish Yadav Vs Maxtern

'बिग बॉस ओव्हर द टॉप २'चा (Bigg Boss OTT 2) विनर एल्विश यादवच्या (Elvish Yadeav) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एल्विश यादव नेहमीच या नाही तर त्या कारणामुळे चर्चेत राहतो. अशातच अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एल्विश प्रसिद्ध युट्यूबर सागर ठाकूर अर्थात मॅक्सटर्नला मारहाण करत असलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून एल्विशला अटक करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मॅक्सटर्नने एल्विश यादवच्या विरोधात हरियाणा पोलिसांकडे एफआयआर दाखल केली आहे.

युट्यूबर सागर ठाकूर अर्थात मॅक्सटर्न कायमच आपल्या व्हिडीओमुळे चर्चेत असतो. नुकतंच मॅक्सटर्नने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडीओमध्ये मॅक्सटर्नने घटनेबद्दल माहिती दिली आहे. मॅक्सटर्न व्हिडीओमध्ये म्हणतो, "मी आज एल्विश यादवला भेटायला गेलो होतो. त्याने मला कोणाच्या तरी घरी भेटायला बोलवलं होतं. त्याने मला पब्लिक लोकेशनवर भेटायला बोलवायला हवं होतं. जर काही वाद असेल, तर तो बोलून सोडवायला हवा होता. शब्दांनी बोलून आपल्यातला वाद मिटला असता."

मॅक्सटर्नने पुढे सांगितले की, "एल्विश यादवला भेटण्यासाठी मी सर्व तयारी केली होती. सोफा लावला होता. एल्विश येण्याची आणि त्याच्यासोबत मी बोलण्याची वाट पाहत होतो. पण एल्विश येताच, त्याने मला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने मला लाथा बुक्क्यांनी मारलं. मारण्यासाठी फक्त तो एकटाच नव्हता. त्याच्यासोबत तब्बल ८ ते १० लोकं एकत्रित होते. त्यांनी मला पकडून खूप मारहाण केली. एल्विशने मला चेहेऱ्यावर आणि नाकावर मारलं. त्यासोबतच त्याने मला जीवे मारण्याची धमकीही दिली. एल्विशने मारहाण केलेला व्हिडीओ रेकॉर्डही केला आहे." असं तो आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला. घटनेबद्दल सविस्तर माहिती त्याने व्हिडीओमध्ये दिली आहे.

घटनेबाबत मॅक्सटर्नने गुरूग्रामच्या सेक्टर ५३ मध्ये तक्रार दाखल केली आहे. मॅक्सटर्नने पोलिस स्थानकांत भारतीय दंड संहिता कलम १४७, १४९, ३२३ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवली आहे. मॅक्सटर्न आणि एल्विश हे दोघेही एकमेकांना २०२१ पासून ओळखत आहेत. दरम्यान दोघांच्याही फॅन्समध्ये काही वाद आहे. त्यामुळे हा वाद झाला आहे. एल्विश यादव गेल्या ४८ तासांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत असून त्याला सातत्याने ट्रोल केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT