Ekta Kapoor Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ekta Kapoor Birthday: बापाच्या या अटीमुळे एकता कपूर अजूनही सिंगल; काय होती ही अट

HBD Ekta Kapoor: अनेक कलाकारांचे करिअर बनवणारी एकता कपूर आज तिचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shivani Tichkule

Entertainment News: बॉलिवूड स्टार जितेंद्र आणि शोभा कपूर यांची कन्या एकता कपूर ही एक यशस्वी चित्रपट निर्माती आहे. बॉलिवूडमधील नामांकित निर्मात्यांच्या यादित तिचं नाव अग्रेसर आहे. लहान वयापासून एकता या क्षेत्रात काम करत आहे. अनेक कलाकारांचे करिअर बनवणारी एकता कपूर आज तिचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यावर जगभरातून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. (Latest Marathi News)

एकता कपूर हे इंडस्ट्रीमधील एक मोठ नाव आहे. तिच्या नावामुळे अनेकांना ओळखले जाते. एकताने आपल्या कामाची सुरवात वयाच्या १५ वर्षापासून केली आहे. तिने तिच्या करिअरची सुरवात चित्रपट निर्माते सुरेंद्रनाथ यांच्यासोबत केली. चित्रपटसृष्टीतील घरातून असल्याने तिला नेहमीच चित्रपटनिर्मितीमध्ये काम करण्यात रस होता. एकता ने 'मानो या ना मानो' या मालिकेतून टिव्ही क्षेत्रात पाऊल ठेवलं.

१९व्या वर्षी पहिली हिट सिरीयल

एकताने मालिका विश्वातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तिने तिची पहिली हिट सिरियल १९व्या वर्षी केली. त्यानंतर 'हम पांच' च्या प्रसिद्धीमुळे तिच्या या क्षेत्रातील कामगिरीला एक नवी उंची मिळाली. (Entertainment News)

k या अक्षराशी एकताचं खास नात

एकताचा नशीबावर खूप विश्वास आहे.तिच्या मते, k हे अक्षर तिच्यासाठी लकी आहे. त्यामुळेच तिच्या अनेक मालिकांची नावे k पासून सुरू होतात. 'कभी सास भी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'कही तो होगा' ,'कसौटी जिंदगी की' अशा अनेक मालिकांच्या नावाची सुरवात 'क' या अक्षराने केलेली आहे.

चित्रपटसृष्टीतही कमालीची कामगिरी

२००१ साली एकताने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. मालिकांनतर तिने डेविड धवन यांच्या 'क्योंकि मैं झूठ नही बोलता' या चित्रपटातून निर्मितीकडे पाऊल टाकलं. त्यानंतर तिच्या चित्रपटांचा आलेख हा उंचावतच आहे.

एकताचा लग्न न करण्याचा निर्णय

मालिकापासून ते चित्रपट अश्या सर्व क्षेत्रात एकताने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एकताने अजूनही लग्न केले नाही. एका मुलाखतीत लग्नाबद्दल विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, तिच्या वडिलांनी तिला सांगितले की, 'एकतर लग्न कर नाहितर काम.' तिने कामाची निवड करुन अजूनही लग्न केले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT