Bhagyshree Fitness Video: 54 वर्षांच्या भाग्यश्रीचं फिट राहण्यामागचं सिक्रेट, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला

Actress Bhagyashree Fitness Secrets: ‘हुस्न की परी’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रेक्षकांवर आजही भूरळ कायम आहे. सध्या भाग्यश्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Actress Bhagyashree Fitness Secrets
Actress Bhagyashree Fitness SecretsInstagram
Published On

Bhagyshree Fitness Viral Video: सलमान खान आणि भाग्यश्री या दोघांनीही ‘मै ने प्यार किया’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र दिसले नाही. पण सध्या अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर आपल्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे. वयाची पन्नाशी पार केली असली तरी, अभिनेत्री आजही आपल्या फिटनेसमुळे कमालीची चर्चेत आली आहे. ‘हुस्न की परी’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीच्या सौंदर्याची प्रेक्षकांवर आजही भूरळ कायम आहे. सध्या भाग्यश्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ती आजही वयाप्रमाणे फिटनेससाठी कोणतीही तडजोड करत नाही, याची प्रचिती येते.

Actress Bhagyashree Fitness Secrets
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor : शेवटी जात आडवी आलीच, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं शेअर केला धक्कदायक अनुभव

‘हुस्न की परी’ नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांसोबत फिटनेसचे महत्व शेअर करते. अनेकदा सोशल मीडियावर भाग्यश्रीने चाहत्यांसोबत व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर केले. नुकताच शेअर केलेल्या नव्या पोस्टमध्ये, ती कार्डिओ करताना दिसत आहे. पोस्टमध्ये भाग्यश्रीने कार्डिओचे आरोग्यासाठी असलेले फायदे देखील सांगितले. जर तुम्हाला कार्डिओ व्यायामाद्वारे तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्ही नक्कीच भाग्यश्रीच्या या पोस्टमधून टिप्स फॉलो करू शकता. सोशल मीडियावर तिच्या टीप्स चाहते फॉलो करतात.

अभिनेत्री अनेकदा कार्डिओ सोबतच अनेक व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या व्हिडीओ अनेक चाहत्यांना खूपच उपयुक्त ठरत असतात. लेटेस्ट व्हिडिओमध्ये ती कार्डिओ करताना दिसत आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ‘कार्डिओ हा तुमच्या वर्कआउटचा अविभाज्य भाग असला पाहिजे. यामुळे आपल्या शरिरातील कॅलरीज बर्न तर होतातच पण आपले हृदयही निरोगी राहते. व्यायामामुळे आपल्या शरीरातील ताकदही वाढते, सोबत व्यायामामुळे आपले शरीरही सुरक्षित राहत असल्याने तुमचे ध्येय पूर्ण करण्यात ही खूप मदत होते.’ सोबतच आपल्या पोस्टमध्ये भाग्यश्री पुढे म्हणते, जर तुम्ही कार्डिओ सुरू करणार असाल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि हे सर्व व्यायाम तुमच्या प्रशिक्षकाच्या निरिक्षणाखालीच करा...

Actress Bhagyashree Fitness Secrets
Bharti Singh And Haarsh Limbachiyaa Bail: कॉमेडियन भारती आणि हर्षला मोठा दिलासा, एनसीबीने दाखल केलेली ही याचिका कोर्टाने फेटाळली...

यापूर्वी अभिनेत्री म्हणाली होती की, आपण सकाळी कार्डिओचा व्यायाम नक्कीच करायला हवा. आपल्या शरीरातील चयापचय (Metabolism) वाढवण्याव्यतिरिक्त आपल्याला दिवसभर उत्साहित ठेवण्याचं उत्तम काम करतं. सकाळी हा व्यायाम केल्याने दिवसभर मूड फ्रेश राहतो. आपण दररोज किमान 30 मिनिटे हे केले पाहिजे, पण या दरम्यान आपण आपल्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com