Prithviraj Sukumaran Meet With On-Set Accident  Saam TV
मनोरंजन बातम्या

Prithviraj Sukumaran Accident : सुप्रसिद्ध साऊथ स्टारचा गंभीर अपघात ; लवकरच शस्त्रक्रिया

Vilayath Buddha movie shooting : पृथ्वीराज 'विलायथ बुद्धा'च्या सेटवर एका फाईट सिक्वेन्सचे शूटिंग करत असताना त्याचा अपघात झाला.

Pooja Dange

Prithviraj Sukumaran Meet With On-Set Accident : मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याचा आगामी चित्रपट 'विलायथ बुद्धा'च्या शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाली असून आज त्याच्यावर की शस्त्रक्रिया होणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो काही आठवड्यांसाठी ब्रेक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पृथ्वीराज 'विलायथ बुद्धा'च्या सेटवर एका फाईट सिक्वेन्सचे शूटिंग करत असताना त्याचा अपघात झाला. कोचीनमधील मरयूर येथे हे शूटिंग सुरू होते. अभिनेत्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून काही आठवडे तो विश्रांती घेणार आहेत. (Latest Entertainment News)

पृथ्वीराजला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे 2 ते 3 महिने ब्रेक घेऊन रेस्ट करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे. अद्याप अभिनेता किंवा रुग्णालय व्यवस्थापनाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

विलायथ बुद्धाचे दिग्दर्शन जयन नांबियार यांनी केले आहे, यापूर्वी त्यांनी अय्यप्पनम कोशियुममध्ये दिवंगत दिग्दर्शक सचीचे सहाय्यक म्हणून काम केले आहे. विलायथ बुद्ध हे त्याच नावाच्या जीआर इंदुगोपन यांच्या कादंबरीचे चित्रपटामध्ये रूपांतर करण्यात येत आहे.

Upcoming चित्रपट

पृथ्वीराज सुकुमारनच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक 'आदुजीविथम'चा ट्रेलर सोशल मीडियावर समोर येताच या चित्रपटाला ऑनलाइन लीकचा सामना करावा लागला. असे असूनही, ट्रेलर नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. बेन्यामीनच्या त्याच नावाच्या बेस्ट-सेलर कादंबरीवर आधारित सर्वायव्हल ड्रामा आदुजीविथम, ब्लेसी यांनी दिग्दर्शित केला आहे.

अभिनेता-दिग्दर्शक त्यांच्या आगामी बॉलिवूड प्रोजेक्ट बडे मियाँ छोटे मियाँमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात तो कबीरची भूमिका करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT