'छावा' (Chhaava) चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहेत. 'छावा'ला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे.
गुजरातमध्ये 'छावा' चित्रपट पाहताना एक घटना घडली आहे. गुजरातमधील भरूच येथील आरके सिनेमागृहात 'छावा' चित्रपटा चालू असताना चक्क चित्रपटगृहाचा पडदा फाडण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. चित्रपटाच्या एका सीन दरम्यान प्रेक्षकाने चित्रपटगृहाचा पडदा फाडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सिनेमागृहात खूप गोंधळ झालेला पाहायला मिळाला.
चित्रपट गृहाचा पडदा फाडणाऱ्या प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना पाहून चित्रपटगृहातील इतर प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. ही घटना 'छावा' चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करतानाच सीन सुरू असताना घडली. प्रेक्षकाला आपल्या भावना अनावर होऊन त्याने थेट चित्रपटगृहाचा पडदा फाडला. यामुळे चित्रपटगृहाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेक्षक आरोपीचे नाव जयेश वसावा असे आहे. चित्रपटाचा शेवटचा सीन सूरू असताना तो पडद्याजवळ आणि अग्निशामक यंत्रानेचा वापर करून त्याने पडद्याचे नुकसान केले. त्यानंतर थिएटरचे कर्मचारी धावत आले. या घटनेनंतर इतर प्रेक्षकांना दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची संधी दिली गेली. तर काही लोकांनी पैसे परत घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.