Amol Kolhe Share Photo From Hospital
Amol Kolhe Share Photo From Hospital Instagram @amolrkolhe
मनोरंजन बातम्या

Amol Kolhe Health Update: अमोल कोल्हेंवर रुग्णालयात उपाचार सुरु, फोटो शेअर करत म्हटलं...

Pooja Dange

Amol Kolhe Share Photo From Hospital: राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांना काही दिवसांपूर्वी पाठिला गंभीर दुखापत झाली होती. 'शिवपुत्र संभाजी' या नाट्यादरम्यान अमोल कोल्हे यांना ही दुखापत झाली होती. अमोल कोल्हे यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली होती.

आता अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात दिसत आहेत. तर काळजी करू नका असं त्यांनी हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

'Nothing to worry!!! (काळजी करण्यासारखं काही नाही) पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं!

थोडीशी सक्तीची विश्रांती... परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू " 11 मे ते 16 मे" हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे *"शिवपुत्र संभाजी"* महानाट्य!!!' असे कॅप्शन देत त्यांनी त्यांचा फोटो शेअर केला आहे.

त्यांच्या या पोस्टवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही कमेंट त्यांना 'सगळं ठीक ना!' असे विचारलं आहे. याचसह अमोल कोल्हे यांच्या या पोस्ट चाहत्यांच्या तसेच कलाकारांच्या अनेक कमेंट येत असून त्यांना विश्रांती करण्याच्या आणि लवकर बरे होण्याच्या सदिच्छा देत आहेत. (Latest Entertainment News)

१ मे रोजी करत येथील प्रयोगादरम्यान त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. प्रयोगादरम्यान घोडेस्वारी करत असताना त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पेन किलर खाऊन त्यांनी प्रयोग केला.

मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड (11 मे ते 16 मे) येथील प्रयोग ठरल्यावेळेप्रमाणे होणार असल्याचे कोल्हेंनी जाहीर केलं आहे. त्यासाठी वेळेत उपचार घ्यावे लागणार आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT