Arbaaz - Nikki Love Connection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz - Nikki Love Connection: अरबाज अन् निक्कीचं खरंच प्रेम आहे? नेटकऱ्यांमध्ये दोघांच्या अफेअरची चर्चा का होतेय?

Bigg Boss Fame Arbaaz And Nikki: बिग बॉसमुळे चर्चेत असलेली जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज. निक्की आणि अरबाजच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉसमुळे चर्चेत असलेली जोडी म्हणजे निक्की आणि अरबाज. निक्की आणि अरबाजच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. कधी एकमेकांच्या प्रेमात तर कधी एकमेकांशी कचाकच भांडणारी ही जोडी खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलीये का? का होतेय सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची चर्चा याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

बिग बॉस मराठी ५ चा सुरू आहे. रितेश देशमुखे बिग बॉस मराठी होस्ट करत आहेत. ब्लॉगर, कन्टेटंर, युट्यूबर आणि अभिनेत्रीचा यात सहभाग आहे. आतापर्यत बिग बॉस मराठीचे सहा आठवडे झाले आहेत. सातवा आठवडा सुरू आहे.

बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच अरबाज आणि निक्की एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. त्या दोघांची एक टिम बनली. या टिममध्ये जान्हवी, निक्की, घनश्याम आणि अरबाज होता. या चौघांचं बॉन्डिग बनलं. यानंतर पुढे निक्की आणि अरबाजमधली मैत्री वाढली. दोघे एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. एकमेकांसोबत बराच वेळ घालवल्यानंतर या दोघांची मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं अशी चर्चा सुरू झाली. याच एकमेव कारण म्हणजे अभिजीत आणि निक्कीची मैत्री.

बिग बॉसच्या घरात दोघा- दोघांच्या जोड्या बनवल्या. यामध्ये निक्की -अभिजीतची जोडी आणि आर्या- अरबाजची जोडी बनवली होती. याच आठवड्यात निक्की आणि अभिजीतची मैत्री झाली. याचा राग अरबाजला आलेला दिसून आला. यानंतर अरबाजने निक्कीशी वाद केला यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबाबत अटकळ्या लावल्या गेल्या.

अरबाजची गर्लफ्रेंड लिझा चर्चेत

बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजची खेळी पाहल्यानंतर सोशल मीडियावर अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिद्राला नेटकरी प्रश्न विचारू लागले. अलिकडेच अरबाजने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट केले होते. अरबाज इनफ्ल्युएंसर लिझा बिद्रासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांनी त्याचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. याचदरम्यान निक्की आणि अरबाजशी जवळीक वाढल्यानंतर नेटकऱ्यांनी गर्लफ्रेंड लिझाला प्रश्न केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT