Do Deewane Shaher Mein vs Assi Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Do Deewane Shaher Mein vs Assi Collection : मृणाल ठाकूर की तापसी पन्नू शनिवारी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी? 'दो दीवाने सहर में' अन् 'अस्सी'चे कलेक्शन वाचा

Do Deewane Shaher Mein vs Assi Box Office Collection Day 2 : 'दो दीवाने सहर में' आणि 'अस्सी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात. दोन्ही चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.

Shreya Maskar

'दो दीवाने सहर में' आणि 'अस्सी' चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाले.

'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल आणि सिद्धांतची केमिस्ट्री खूपच कमाल आहे.

'अस्सी' चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू झळकली आहे.

मृणाल ठाकूरचा 'दो दीवाने सहर में' आणि तापसी पन्नूचा 'अस्सी' चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. हे दोन्ही चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'दो दीवाने सहर में' चित्रपट संजय लीला भन्साळी निर्मित आणि रवी उदयवर दिग्दर्शित आहे. 'दो दीवाने सहर में' चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे. दोन्ही चित्रपटांनी शनिवारी किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'दो दीवाने सहर में' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'दो दीवाने सहर में' चित्रपटाने 1.25 कोटी रुपयांनी ओपनिंग केली आहे. तर चित्रपटाने शनिवारी दुसऱ्या दिवशी 1.60 कोटी रुपये कमावले. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण व्यवसाय 2.85 कोटी रुपये झाला आहे. तर 'दो दीवाने सहर में' चित्रपटाने जगभरात जवळपास 3.40 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल ठाकूर सिद्धांत चतुर्वेदीसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसत आहे. चित्रपटात मृणाल आणि सिद्धांतची केमिस्ट्री खूपच कमाल आहे. हा चित्रपट आजकालच्या आधुनिक प्रेम पद्धतीवर फिरतो. हा चित्रपट दोन इम्परफेक्ट लोकांची गोष्ट सांगतो. त्यांचे प्रेम मात्र परिपूर्ण आहे. पहिल्यांदाच मृणाल आणि सिद्धांतची जोडी एकत्र दिसत आहे. 'दो दीवाने सहर में' चित्रपटात मृणाल रोशनीची व्यक्तिरेखा तर सिद्धांत शशांकची व्यक्तिरेखा साकारली आहे.

'अस्सी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'अस्सी' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 1.60 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दोन दिवसांत चित्रपटाने 2.60 कोटीं रुपये कमावले आहेत. तापसी पन्नूच्या 'अस्सी' चित्रपटाने जगभरात 3.10 कोटी कमावले आहेत.

'अस्सी' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू झळकली आहे. चित्रपटात बलात्कार प्रकरणाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात तापसीने बलात्कार पीडितेच्या वकिलाची भूमिका साकारली आहे. तर कानी कुसरुती हिने बलात्कार पीडितेची भूमिका केली आहे. दोघांच्या अभिनयाचे भरपूर कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nauvari Saree Hairstyles: अंबाड्यापासून ते वेणीपर्यंत..., या 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स नऊवारी साडीवर नक्की ट्राय करा

Maharashtra News Live Update: भंडाऱ्याजवळ वाळू घाटावर भरधाव धावणारा ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू

Wage Code: १५ मिनिटे जास्त काम अन् पगार होणार डबल! सरकारचा मोठा निर्णय काय? वाचा नवे नियम

Marathi compulsory: 'मराठी बोलायला लाज का वाटते?'; 'कमळी'फेम अभिनेत्रीचा थेट सवाल, VIDEO व्हायरल

Famous Actress Wedding : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; हातावर रंगली मेहंदी, होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT