Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : "मेरे करण, अर्जुन आ गए..."; ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, जुळ्या मुलांना दिला जन्म

Divyanka Tripathi Blessed With Twin Baby Boys : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४१ व्या वर्षी आई झाली आहे. नुकतीच अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्री ४१ व्या वर्षी झाली आई

अभिनेत्रीने गोंडस मुलांना दिला जन्म

चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा असलेली अभिनेत्री आई झाली आहे. तिच्या घरी गोंडस बाळाचे स्वागत झाले आहे. अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'ये हे मोहब्बते' फेम अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आहे. तिने नुकतीच ही डबल गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

४१ व्या वर्षी अभिनेत्री झाली आई

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी वयाच्या ४१ व्या वर्षी आई झाली आहे. तिने दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे. दिव्यांका आणि तिचा नवरा विवेक दहिया यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये दोन बाळ दिसत असून त्यावर एक सुंदर मेसेज दिला आहे. लिहिलं की, "आम्ही सुख मागितले... तेव्हा देवाने म्हटले, दुप्पट घ्या... आम्हाला जुळी मुलं झाली आहेत..."

दिव्यांका त्रिपाठी - विवेक दहिया पोस्ट

"अखेर आमची प्रतीक्षा संपली...

आमचे Boys (मुले) आले आहेत आणि आमचे आयुष्य, आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती त्यापेक्षाही अधिक सुंदर भासत आहे...

माझे 'करण-अर्जुन' आले!

मला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची गरज आहे...

मी पालकत्वाच्या या अविश्वसनीय नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे..."

चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

दिव्यांका त्रिपाठी - विवेक दहिया यांच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्यांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच दिव्यांका आणि तिच्या दोन जुळ्या मुलांच्या तब्येतीची काळजी करत आहेत.

दिव्यांका-विवेक लव्ह स्टोरी

दिव्यांका त्रिपाठीला 'ये है मोहब्बतें ' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिने यात इशिताची भूमिका साकारली. याच मालिकेत तिची विवेकसोबत ओळख झाली. विवेक पोलीसांच्या भूमिकेत दिसला. मालिकेच्या सेटवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी 2016 ला लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Tata Aeris Launched: खुशखबर! ₹5.29 लाखांत आली टाटाची नवी कार, फीचर्सही जबरदस्त

Gold Vastu Tips: घरामध्ये सोनं ठेवण्यापूर्वी 5 महत्वाचे नियम लक्षात घ्या

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT