IPL 2025 Disha Patani Trolled: Saam Tv
मनोरंजन बातम्या

IPL 2025: आयपीएल २०२५ ओपनिंग डान्समुळे दिशा पाटनी ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'लहान मुले देखील...'

IPL 2025 Disha Patani Trolled: आयपीएल २०२५ ओपनिंग सोहळ्यात खास दिशा पाटनीचा डान्स पाहायला मिळाला. मात्र डान्स झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

Shruti Vilas Kadam

IPL 2025 Disha Patani Trolled: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लीग क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने झाली. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रंगारंग ओपनिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रींनी हजेरी लावली. दरम्यान ओपनिंग सोहळ्यात खास दिशा पाटनीचा डान्स पाहायला मिळाला. मात्र डान्स झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे.

दिशा पटानीचा आयपीएल २०२५ समारंभात जबरदस्त डान्स व्हायरल

अनेक सोशल मीडिया नेटकऱ्यांनी दिशा पाटनीच्या जबरदस्त डान्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी दिशाने आयव्हरी ब्रॅलेट आणि हिऱ्यांच्या नक्षीदार स्कर्टमध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने तिच्या जबरदस्त डान्सने चाहत्यांना घायाळ केले. पण आयपीलमधील तिच्या कपड्यांवरून आणि डान्सवरून ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रॉल होत आहे.

दिशाला ट्रॉल करायला सुरुवात

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिशाच्या डान्समुळे या आयपीएलमध्ये तिला निमी स्कर्ट आणि क्रॉप बिकिनी टॉप नव्हता घालायला द्यायला पाहिजे होता असे नेटकरी बोलत आहेत. एका नेटकाऱ्यानी कमेंट केली, आयपीएल लहान मुले देखील बघतात त्यात भान ठेवा, आणखी एकाने लिहिले आपली भारतीय संस्कृती विसरू नका, एकाने लिहिले, तुम्ही भारतात आहात विसरलात का ?

दरम्यान, दिशेसह यावेळी गायिका श्रेया घोषालने देखील काही गीत सादर केले. तसेच बॉलीवूडचा किंग खान आणि किंग कोहलीसोबत पठाण या चित्रपटातील गाण्यावर मन मुराद नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

SCROLL FOR NEXT