Disha Patani  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Disha Patani House Firing Case : धाड धाड धाड...! दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Disha Patani House Firing Case Update : दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी ही कारवाई केली.

Vishal Gangurde

दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघा गुन्हेगारांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला

आरोपी रविंद्र उर्फ कल्लू आणि अरुण हे गोल्डी बरार आणि रोहित गोदारा गँगचे सदस्य

12 सप्टेंबर रोजी सकाळी 3.45 वाजता दिशाच्या घरावर 9 राऊंड गोळीबार झाला होता.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशाच्या वडिलांना फोन करून सुरक्षेचं आश्वासन दिलं होतं.

उत्तर प्रदेशच्या अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटी हद्दीत पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी दोन्ही आरोपींना एन्काऊंटर करत ठार केलं. ही कारवाई यूपी एसटीएफ, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफने मिळून कारवाई केली.

एन्काऊंटरमध्ये मारले गेलेल्या आरोपींचे नावे समोर आले आहेत रविंद्र उर्फ कल्लू आणि अरुण असे दोघांची नावे आहेत. दोघे कुख्यात गँगस्टर गोल्डी बरार आणि रोहित गोदारा गँगचे सदस्य होते. घटनास्थळावरून ग्लॉक आणि जिगाना पिस्तुलसहित अनेक काडतुसे सापडले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दोघांनी १२ सप्टेंबर रोजी सकाळी ३.४५ वाजता दुचाकीवरून येत अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर नऊ राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर गँगने सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. अभिनेत्री दिशाची बहीण खुशबू पटानीने कथावाचक प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर गोळीबार केल्याचा दावा गोल्डी गँगने केला होता.

गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशा पटानीचे वडील आणि माजी डीएसपी जगदीश पटानी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर त्यांना सुरक्षतेचं आश्वासन दिलं. पोलिसांनी अडीच हजारहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटवली. या प्रकरणातील इतर आरोपींना लवकर अटक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या ग्रामीण भागात 62 रुपयांना मिळणार रॉकेल

MI vs RCB IPL 2026:मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक, मुंबईला घरच्या मैदानात RCBनं हरवलं!

करमाळ्यात मेंढपाळसहीत महिलेला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Acid Attack: पुन्हा अ‍ॅसिड हल्ला! दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी तरुणीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड सदृश रसायन

Ranjangaon: भीमाशंकरनंतर आता अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर बंद? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT